Thane: सासूला जनावरासारखं मारलं, सुनेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल चीड!

मुंबई तक

ADVERTISEMENT

thane mother law beaten like animal get angry after seeing video of daughter in law
thane mother law beaten like animal get angry after seeing video of daughter in law
social share
google news

Viral Video: सासू-सुनांचे वाद (Mother-in-law dispute) कोणाला नवीन नाहीत. मात्र सध्या सोशल मीडियावर सुनेकडून सासूला फरफटत बाहेर काढतानाचा एका व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होतो आहे. हा व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील (Thane Crime) असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला सोफ्यावर बसली आहे. त्या सासूला सुनेकडून त्रास देण्यात येत आहे. आणि सून सासूला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या व्हिडीओमध्ये सुनेकडून खूप वाईट पद्धतीने वयोवृद्ध महिलेला (old woman) फरशीवरून फरफटत ओढले जात असून तिला बाहेर काढण्यासाठी सून प्रयत्न करत आहे.

ADVERTISEMENT

सासूला फरफटत ओढले

सुनेकडून सासूला फरफटत ओढत घेऊन जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या व्हिडीओमध्ये सासू सोफ्यावर बसली आहे. त्यानंतर तिच्याजवळ सून आली आहे, आणि तिला ती त्या सोफ्यावरुन उठण्यास सांगत आहे. मात्र सासू सोफ्यावरुन उठून जात नाही म्हणून ती तिला जबरदस्तीने ओढण्यास सुरुवात करते. त्यावेळी वयोवृद्ध महिला आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे.

हे हा वाचा >> Rashid Latif: भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकमध्ये हत्या; कोणी संपवलं नराधमाला?

सुनेविरुद्ध गुन्हा

त्यानंतर सून सोफ्यासमोर असलेला दरवाजा उघडते, आणि सासुला घराबाहेर जाण्यास सांगते. त्यानंतर बसलेल्या ठिकाणी येत सुनेकडून तिला फरशीवरुन फरफटत ओढत बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हे वाचलं का?

सासूला मारहाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये त्या सासू-सुनेबरोबरच आणखी एक महिला किचनच्या दरवाजावर उभी असलेली दिसते. मात्र ती यामध्ये हस्तक्षेप करताना दिसून येत नाही. तिच्या हालचालीवरून ती घरकाम करणारी महिला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी सासूला मारहाण करणाऱ्या सुनेलाही कोणाची तरी फोन आलेला आहे. मात्र तो फोन कोणाचा आहे हे मात्र समजू शकले नाही. फोनवर बोलून झाल्यानंतर पुन्हा ती सून सासुकडे येत आणि पुन्हा ती जबरदस्ती करताना दिसते. त्यावेळी पुन्हा तिच्याकडून सासूला वाईट पद्धतीने फरफटत ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे हा वाचा >> ‘अल्पवयीन मुलींना पाहून मी विचलित होतो..’ अन् वासनांध आरोपी जायचा मंदिरात!

पोलिसांची थेट कारवाई

ठाण्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र कोपरी पोलिसांनी सासूला मारणाऱ्या सुनेविरुद्ध 336, 337, 323, 504, 506 या कलमाखाली तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र हेही कळाले नाही की घरात बसलेल्या वयोवृद्ध महिलेला सून का जबरदस्तीने ती बाहेर काढत आहे. त्याचबरोबर घरामध्ये ही सीसीटीव्ही का लावण्यात आला आहे हे ही अजून स्पष्ट झाले नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT