Badaun : Badaun : चिमुकल्यांवर वस्तऱ्याने वार, जागेवरच केलं ठार; बदायूत रक्ताचा सडा

रोहिणी ठोंबरे

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. काल (19 मार्च) रात्री साजिद आणि जावेद नावाच्या तरूणांनी आयुष (13) आणि अहान (6) या निरागस मुलांची घरात घुसून हत्या केली. धारदार वस्तऱ्याने गळा चिरून निरपराधांची हत्या केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Budaun Double Murder Case : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायूमध्ये दुहेरी हत्याकांडामुळे (Double Murder Case) खळबळ उडाली आहे. काल (19 मार्च) रात्री साजिद आणि जावेद नावाच्या तरूणांनी आयुष (13) आणि अहान (6) या निरागस मुलांची घरात घुसून हत्या केली. धारदार वस्तऱ्याने गळा चिरून निरपराधांची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी साजिदने मृत मुलांच्या आईला सांगितले की, 'आज मी माझं काम पूर्ण केलं आहे.' एफआयआरमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे. (Uttar Pradesh Budaun Double Murder Case Salon barber kills two minor brothers)

मृत मुलांचे वडील विनोद कुमार यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 'साजिद आणि जावेद 19 मार्च रोजी घरात घुसले होते. साजिदने माझ्या पत्नीकडे पैसे मागितले होते. त्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याचं सांगत तो गच्चीवर गेला. तिथे त्याने आयुष आणि अहान यांच्यावर वस्तऱ्याने वार करून त्यांची हत्या केली. तिसऱ्या मुलावरही हल्ला करण्यात आला मात्र तो यातून वाचला. 

विनोद कुमार यांनी एफआयआरमध्ये पुढे लिहिले, 'जेव्हा साजिद आणि जावेद गच्चीवरून खाली येत होते, तेव्हा माझ्या पत्नीला त्यांच्या हातात रक्ताने माखलेला वस्तरा दिसला. घरातून बाहेर पडताना तो म्हणाला की आज मी माझं काम पूर्ण केलं आहे.

हे सर्व पाहिल्यानंतर पत्नी घाबरली आणि तिने गच्चीवर धाव घेतली. तिथे मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. या दरम्यान साजिदने संधी साधून तिथून पळ काढला.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp