मुलीची छेडछाड… ओढणी ओढली अन् घडला अनर्थ ; भयानक व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमध्ये मुलीची छेडछाड करताना सायकलवरुन जाताना तिची ओढणी ओढली गेली. त्यामुळे तिचा तोल जाऊन पडत असतानाच दुचीकीने तिला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावरुन आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT
Uttar Pradesh Crime : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खून, मारामारी, अत्याचार यांचे प्रमाण वाढत असतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर (social media) सध्या सायकरलवरुन जाणाऱ्या दोन शाळकरी मुलींची दोघां तरुणांनी छेडछाड (Girl teasing) केली होती. सायकलवरुन जाताना मुलीची ओढणी ओढल्याने तिचा तोल जाऊन अपघात झाला. या अपघातात तिचा मृत्यू (Girl Death) झाला असून संबंधित दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (uttar pradesh viral video girl death in accident pulled teasing video viral)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय ?
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो उत्तर प्रदेशमधील आंबेडकरनगर जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे. त्या व्हिडीओमध्ये दोन शाळकरी मुली सायकरलवरुन जात असताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी त्यांच्या मागून येणाऱ्या दोन तरुणांनी एका मुलीची ओढणी ओढली. त्यामुळे मुलीचा सायकरवरचा तोल गेला आणि ती पडत असताना मागून आलेल्या दुचाकीने सायकलसह त्या मुलीला उडवले. त्याच धडकेत त्या मुलीचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगीही सायकलवरुन खाली पडली आहे. या संतापजनक व्हिडीओमध्ये मुलींची छेडछाड काढल्याने उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा >> Nandurbar News : धक्कादायक ! नंदुरबार सरकारी रुग्णालयात 179 बालकांचा मृत्यू, पालकांचा आक्रोश
मुलींची छेडछाड
सायकलवरुन घरी जाणाऱ्या दोन मुलींची छेडछाड करुन मुलीची ओढणी ओढणारी आणि नंतर अपघात झालेली सर्व घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छेडछाड करणाऱ्या त्या दोन युवकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली. मात्र ही घटना घडल्यानंतर काही वेळात पोलिसांनी छेडछाड करणाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात मुलींना धडक देणाऱ्या दुचाकीस्वारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे वाचलं का?
बेहद दुःखद 😢
अम्बेडकर नगर में एक स्कूली छात्रा छुट्टी के बाद साइकिल से घर जा रही थी।
शाहबाज और अरबाज ने लड़की का दुपट्टा खींच लिया।
लड़की गिर गई और पीछे से आ रही बाइक लड़की पर चढ़ गई , छात्रा की मौके पर ही मौत।
पिता ने कहा शहवाज और अरबाज लड़की को कई दिनों से कर रहे थे… pic.twitter.com/Njmxqgxk1Z— अंशुमान (@Anshuman_BJP1) September 16, 2023
ADVERTISEMENT
विद्यार्थिनीचा हाकनाक बळी
सोशल मीडियावर जो संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील हिरापूर बाजारपेठेतील आहे. बाजारपेठेत आलेल्या दोघा भावांनी सायकलवरुन जाणाऱ्या मुलींना आधी आडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना विरोध करत मुली पुढे निघून गेल्या. त्यानंतर त्या दोघां भावांनी सायकलवरुन जाणाऱ्या शाळकरी मुलींची छेडछाड काढत एका मुलीची ओढणी ओढली. दुचाकीवरून जाताना ओढणी ओढली गेल्यामुळे मुलीचा तोल जाऊन ती सायकलवरुन पडत असतानाच पाठीमागून आलेल्या दुचीकीने मुलीला जोरदार धडक दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?
व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दुचाकीस्वारासह धडक देणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT