दोन महिलांनी मिळून पुरुषाची छेड काढली, संतापलेला पुरुष पोलीस ठाण्यात गेला अन्..
Varanasi crime news : वाराणसीमध्ये पुरुषांना अश्लील इशारे करून छेडछाड केल्याच्या तक्रारींनंतर अँटी रोमिओ पथकाने दोन तरुणींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन तरुणींनी मिळून पुरुषाची छेड काढली
संतापलेला पुरुष पोलीस ठाण्यात गेला अन्..
Varanasi crime news : बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, कॉलेजच्या बाहेरील रस्ता अशा ठिकाणी अनेकदा रोड रोमिया दिसतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना छेडणं, अश्लिल हावभाव करणं, टॉन्ट मारणं अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून सुरु असतात. अशा रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. ही पथकं अशा रोड रोमियोंना चांगलाच धडा शिकवत असतात. पण आता जग बदलतंय आणि आजूबाजूच्या गोष्टी देखील बदलत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आता लिंगभेद राहिलेला नाही. वाराणसीमधून चक्क दोन महिलांनी अनेक पुरुषांची छेड काढल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा : मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
अश्लिल इशारे करताना पकडल्या गेल्या अन्..पुढे काय घडलं?
रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या पिलरजवळ थांबवून दोन महिला पुरुषांना छेडत असल्याचा प्रकार समोर आलाय. या महिला या पिलरच्या बाजूला थांबून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना छेडणं आणि अश्लिल इशारे करताना पकडल्या गेल्यात आणि त्यांच्यावर आता गुन्हा देखील दाखल झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात..
हेही वाचा : Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?
