Vasai Murder: डोक्यात 15 वार, 30 सेकंदात खेळ खल्लास! Inside Story

निलेश झालटे

ADVERTISEMENT

वसई: तरुणीच्या हत्येची Inside Story
वसई: तरुणीच्या हत्येची Inside Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वसईत प्रेयसीची भर रस्त्यात हत्या

point

वाचा हत्येची नेमकी इनसाईड स्टोरी

point

वसईत पोलिसांचा हलगर्जीपणामुळे तरुणीचा गेला जीव

Vasai Murder Inside Story: वसई: सकाळची वेळ, लोक आवरुन कामाला निघालेले. वसईच्या चिंचपाडा परिसरातही अशीच काहीशी लगबग होती. एक वीस वर्षांची तरुणी पाठीवर बॅग अडकवून निघालेली. साडेआठ वाजेची वेळ. अचानक पाठीमागून एक तरुण आला. हातात लोखंडाचा भला मोठा पाना. मागून एक वार त्या तरुणीच्या डोक्यात केला. ती खाली कोसळली, मग त्यानं सपासत एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 15 वार तिच्या डोक्यात केले. रक्ताचा सडा पडला, जागीच तिचा जीव गेला. तिचा जीव जातानाही तो तिच्याशी बोलत होता. माझ्यासोबत असं का केलं? विचारत होता. नराधमाच्या डोक्यात राग होता महिन्याभरापूर्वी झालेल्या ब्रेकअपचा. सहा वर्षांचं प्रेम अवघ्या अर्ध्या मिनिटात संपलं. (vasai murder six years of love lover brutally murders girlfriend killed in 30 seconds read inside story)

ADVERTISEMENT

ती बिचारी गेली, प्रतिकारही करु शकली नाही. मात्र तिच्यासोबत माणुसकीही मेली का? असाच प्रश्न या घटनेचे व्हिडीओ पाहताना अनेकांना पडला. एका व्यक्तीचा अपवाद वगळता तिला वाचवण्याचा प्रयत्न कुणी केला नाही, उलट काहींनी व्हिडीओ शूट केला. वसईतल्या घटनेनं मुलीच्या घरच्यांसह समाजमन हादरुन गेलंय. याच घटनेची इनसाईड स्टोरी.

30 सेकंदात घेतला प्रेयसीचा जीव, वाचा Inside Story

ही घटना वसईत घडलीय, पण व्हिडीओ पाहून सगळेच हादरलेत.  वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात ही घटना घडलीय. आज सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ असताना रोहित यादव नावाच्या नराधमानं लोखंडी पाना काढून आरती यादवला भरदिवसा भररस्त्यात संपवलं.  हल्ल्यानंतर तरूणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. आरोपी तरूण हा हातात लोखंडी पाना घेऊन तिच्या मृतदेहाशेजारी उभा राहून तिच्याशी बोलत होता. आरोपीला आता ताब्यात घेतलंय. या घटनेवरुन आता राजकीय लोकंही बोलायला लागलीत. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर माझी बहीण वाचली असती असं मयत आरतीच्या बहिणीनं म्हटलंय.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> लोखंडी पानाने डोक्याचा चेंदामेंदा, भररस्त्यात प्रेयसीची निर्घृण हत्या; वसई हादरली!

22 वर्षीय आरती यादव नालासोपारा (पूर्व) येथे राहत होती. ती मूळची राहणार उत्तर प्रदेशमधील.  32 वर्षीय आरोपी रोहीत यादवही नालासोपारा पूर्व येथील राहणार आहे. तो मूळचा हरियाणाचा. आरती यादव ही वसईच्या चिंचपाडा परिसरातील कंपनीत कामाला होती. रोहित यादव आणि आरती यादवचे गेल्या सहा वर्षांपासून  प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव हा बेरोजगार होता. महिनाभरापूर्वीच दोघांचंही ब्रेकअप झालं होतं. आरतीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला होता. याच संशयातून रोहितने आरतीची हत्या केल्याचं म्हटलं जातंय.

   
वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरातली साडेआठ वाजता रोहितने अचानक डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी एक वार करत आरतीला जमिनीवर पाडलं.. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा वार केले. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे झाला. तिनं जीव सोडला पण रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया.. क्यूं किया.., असं तो बोलत राहिला, आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत राहिला. शेवटी पाना तिथंच फेकला. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवला अटक केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> पुण्यातील PNG ज्वेलर्सच्या कॅलिफोर्नियातील शोरुमवर दरोडा! पाहा CCTV व्हिडीओ

आता ही घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय खरं.. मात्र, हा संताप आरतीच्या बहिणीने दिलेल्या स्टेटमेंटनंतर अजून वाढतोय. आरतीच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. 'गेल्या शनिवारी आरोपी रोहित यादव याने आरतीला मारहाण करून तिचा मोबाईल फोडला होता. माझ्या बहिणीला अगोदरही मारण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रविवारी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात ही गेलो होतो. पोलिसांनी त्याला एक दोन दंडे मारून सोडून दिलेलं. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी पीडितेला आणि तिच्या बहिणीला आता आरोपी काही करणार नाही असे सांगून परत पाठवलेलं.  माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून ती कामाला जात होती. आता आरतीचा जीव गेला. आम्हाला न्याय पाहिजे', अशी मागणी मयत तरूणी आरतीच्या बहिणीनं केली आहे. 
 
या घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यांनी ट्वीट करत कारवाईचे आदेश दिले आहेत. विरोधी नेतेही मैदानात उतरले आहेत. नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत. पोलीस यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. मात्र, आता आरती या जगात नाही हे सत्य आहे. आरती गेली, आरोपीला शिक्षा होईल, मात्र अशा हिंसक घटनांना लगाम घालण्यात अपयशी यंत्रणांवर आणि घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्यांच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT