धक्कादायक ! यवतमाळमध्ये महिन्याभरात 15 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Vidarbha Yavatmal district 15 farmers suicide one month Maharashtra, farmers in financial crisis
Vidarbha Yavatmal district 15 farmers suicide one month Maharashtra, farmers in financial crisis
social share
google news

Farmer Suicide : एकीकडे देशात महिला आरक्षणाचे विधेयकावर जोरदार चर्चा सुरु असतानाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे राज्यातील दयनीय परिस्थिती समोर आली आहे. यंदा राज्यात पाऊस झाला असला तरी मराठवाडा, विदर्भामध्ये (Vidarbha) शेतकऱ्यांसाठी हवा असणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात (economical crisis) सापडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही (Yavatmal district ) पावसाने उघडीप दिल्याने शेती संकटात सापडली आहे.  एका महिन्यात 15 तर तीन दिवसात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशासनही हादरले आहे. त्यामुळेच आता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. (Vidarbha Yavatmal district 15 farmers suicide one month Maharashtra, farmers in economical crisis)

ADVERTISEMENT

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

नैसर्गिक संकटाबरोबरच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावल्याने यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्याने त्याची चौकशी सुरु करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हे ही वाचा >> Women Reservation Bill : आजचा दिवसही ऐतिहासिक, 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार

आत्महत्यांची चौकशी सुरु

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी माहिती देताना सांगितली के, एका महिनाभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी त्या आत्महत्या शेतीच्या कारणामुळेच केल्या आहेत की, त्याला इतर कोणती कारणं आहेत त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

तीन दिवसात 6 आत्महत्या

महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे माजी अध्यक्ष कार्यकर्ते किशोर तिवारी यांनीही एक धक्कादायक माहिती दिली आहे. किशोर तिवारी यांनी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितले आहे की, 17 ते 19 सप्टेंबर या काळात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय याचाही शोध घेण्यात येत आहे.

हे ही वाचा >> ‘त्या’ विधेयकाचे स्वागतच पण…, ‘सामना’तून सरकारच्या वर्मावर बोट

पावसाने ओढ दिली

महाराष्ट्रात यंदा पाऊस झाला असला तरी काही भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. विदर्भातील शेतकरी पावसामुळेच अडचणीत सापडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे महिनाभरात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने आता प्रशासनाकडून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं शोधली जात आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT