दलालांनी मांडला वासनेचा बाजार, आधी वेबलिंक आणि फोटो, नंतर लॉज...

मुंबई तक

सेक्स रॅकेटसाठी आधी वेबलिंक पाठवायची, नंतर महिलांचे फोटो आणि त्यानंतर लॉजवर रुमची व्यवस्था करणाऱ्या तीन दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र लॉज मालक फरार झाला असून त्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं रवाना केली आहेत.

ADVERTISEMENT

sex racketa navi Mumbai
sex racketa navi Mumbai
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दलालांनी मांडला वासनेचा बाजार

point

वेश्याव्यवसायाठी सोशल मीडियाचा भयंकर वापर

Crime: नवी मुंबईतील (Navi Mumbai lodge) एका लॉजमध्ये सेक्स रॅकेट  (Sex racket) चालवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याचबरोबर  घटनास्थळावरून तीन महिलांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. लॉजवर चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटप्रकरणी आत लॉजच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. 

बनावट ग्राहक

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'नवी मुंबईमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलला मिळाली होती.  त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी बनावट ग्राहकाला त्या लॉजवर पाठवण्यात आले. 

त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी नेरुळमधील शिरवणे येथील राज इन लॉजिंग अँड बोर्डिंगच्या आवारात छापा टाकला.

तीन महिलांना आश्रय

पोलिसांनी छापा टाकताच लॉज मॅनेजरसह तीन दलालांनाही ताब्यात घेण्यात आले.  यावेळी पोलिसांना तीन महिलाही घटनास्थळी मिळाल्यानंतर त्यांना आश्रय देण्यात आला आहे. यावेळी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे सांगितले.