मोमोज खाणाऱ्या पोलिसालाच उचललं, घडली भयंकर घटना..

मुंबई तक

ADVERTISEMENT

while eating momos there was such an uproar know the whole matter
while eating momos there was such an uproar know the whole matter
social share
google news

मुरैना (मध्य प्रदेश): मोमोज (Momos) खाणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलला काही तरुणांनी जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत उचलून नेत बेदम मारहाण केल्याची घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मुरैना येथे घडली आहे. कॉन्स्टेबलने कसंबसं तरुणांच्या तावडीतून सुटका करून पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिली. ज्यानंतर या प्रकरणी 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या रात्रीच पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते. हे संपूर्ण प्रकरण शहरातील न्यू हाऊसिंग बोर्ड कॉलनी परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. (while eating momos there was such an uproar know the whole matter)

ADVERTISEMENT

प्रत्यक्षात बुधवारी संध्याकाळी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल रामकुमार सिंह न्यू हाउसिंग बोर्ड कॉलनीतील एका दुकानात मोमोज खात होता. तेव्हाच स्कॉर्पिओ कारमधून काही तरुण तेथे पोहोचले. त्यांनी दुकानदाराला बोलावले. दुकानदार त्यांच्याकडे उशिरा पोहोचल्याने गाडीतील तरुणांनी खाली उतरून दुकानदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा- लग्नासाठी मुलगी बघायला आलेला तरूण, होणाऱ्या सासूलाच नेलं पळवून!

मध्यस्थी केल्याने हवालदाराला मारहाण, अपहरण

दुकानदाराला मारहाण होत असल्याचे पाहून हवालदार रामकुमार यांनी मध्यस्थी करत भांडण करणाऱ्या तरुणांना समजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तरुणांना राग आला आणि त्यांनी थेट रामकुमारलाच हाणामारी सुरू केली. त्यानंतर तरुणांनी रामकुमारला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवलं. कारमध्ये हवालदाराशी युवकांची जोरदार बाचाबाची झाली. गाडी खनेटा गावाजवळ आली असता रामकुमारने तरुणांच्या तावडीतून सुटका करून तिथून पळ काढला.

हे वाचलं का?

 

पोलीस कॉन्स्टेबल रामकुमार सिंह

 

ADVERTISEMENT

हे ही वाचा- पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…

हवालदाराचा मोबाइलाही हिसकावून घेतला

हल्लेखोरांनी रामकुमार याचा मोबाइलही हिसकावून घेतला होता, त्यामुळे त्याला या घटनेची माहिती पोलीस विभागाला त्वरित देता आली नाही. पण हल्लेखोरांच्या तावडीतून पळाल्यानंतर कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. ज्यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि हवालदाराला सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून 6 हल्लेखोरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा- अकोला हादरला! चौथीतील 4 विद्यार्थिनींवर शिक्षकच दररोज करायचे लैंगिक अत्याचार

सर्व हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणावर सीएसपी अतुल सिंह यांनी असं म्हटलं की, माहिती मिळाल्यानंतरच पोलिसांचे पथक तरुणांना पकडण्यासाठी पाठवण्यात आले आणि बुधवारी रात्रीच बदमाशांना पकडण्यात आले. या मारामारीत हवालदाराच्या अंगावर जखमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याची वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT