Titwala crime news : पत्नीने घोटला गळा, अन्…; पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे फुटलं बिंग
टिटवाळामध्ये एका महिलेने पतीची हत्या केल्याची घटना घडली. मात्र, पतीचा मृत्यू दारू पिण्यामुळे झाल्याचा दावा महिलेने केला. पोस्टमार्टेम रिपोर्टमधून हत्याचे स्पष्ट झाले.
ADVERTISEMENT
Titwala Crime : आधी पतीची गळा आवळून हत्या केली. पण, पतीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पोलिसांना पटवून देण्यासाठी वेगळंच कारण सांगितलं. पण, पोस्टमॉर्टेम रिपोर्टने आरोपी पत्नीच्या बनावाचं बिंग फुटलं. इतकंच नाही, तर पतीची हत्या का केली, याचं कारणंही महिलेने पोलिसांना सांगितलं.
ADVERTISEMENT
पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात घडली. प्रवीण मोरे असे मयत इसमाचे नाव आहे. प्रणिती मोरे असे आरोपी महिलेचे नाव असून टिटवाळा पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर दारूमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव प्रणितीने केला होता, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टने प्रकरणाला नवं वळण दिले.
महिलेने का केली पतीची हत्या?
टिटवाळा जवळ बल्याणी परिसरात परिसरात प्रवीण मोरे व प्रणिती मोरे हे पती पत्नी राहत होते. प्रवीणला दारूचे व्यसन होते. प्रवीण दारू पिऊन प्रणिताशी वाद घालायचा.
हे वाचलं का?
वाचा >> नीलिमा चव्हाण शेवटची भेटलेली ‘त्या’ जोडप्याला.. नेमकं काय घडलं?
तीन ऑगस्ट रोजी प्रवीण दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने प्रणितीची वाद घालण्यास सुरुवात केली. भांडणाच्या कटकटीला वैतागलेल्या प्रणितीने प्रवीणचा गळा आवळला. यातच प्रवीणचा मृत्यू झाला.
वाचा >> Mumbai crime : ‘वाढदिवसाला भेट, प्रेम अन् बलात्कार’, मॉडेलने दाखवले व्हिडीओ
हत्या केल्यानंतर प्रणितीने हे कृत्य लपवण्यासाठी वेगळा बनाव रचला. प्रवीणचा मृत्यू दारू पिल्यामुळे झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पण, प्रवीणच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार, हे ती विसरूनच गेली आणि इथेच तिचं बिंग फुटलं.
ADVERTISEMENT
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
प्रवीणच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. टिटवाळा पोलिसांना प्रणितीवर संशय आला. पोलिसांनी प्रणितीला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली. प्रणितीने अखेर प्रवीणची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. दारू पिऊन वारंवार भांडण करत असल्याच्या रागातून प्रवीणची हत्या केल्याची कबुली प्रणितीने दिली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रणिती मोरे हिला अटक केलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT