Crime News : महिलेने डॉक्टरचा कापला प्रायव्हेट पार्ट, नंतर तो पाठवला पत्नीला
Crime news in Marathi : डॉक्टरच्या हत्येप्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महिलेला जामीन मंजूर केला आहे. ही महिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती.
ADVERTISEMENT
डॉक्टरच्या हत्येप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महिलेला जामीन मंजूर केला आहे. दहा वर्षापूर्वी, महिलेला एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. महिलेने डॉक्टरांचे प्रायव्हेट पार्ट कापून तिने ते त्याच्या पत्नीकडे पाठवले होते. या घटनेत महिलेला 2016 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
ADVERTISEMENT
मुख्य न्यायमूर्ती प्रीतिनकर दिवाकर आणि न्यायमूर्ती नलिन कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. रिमांडचा कालावधी लक्षात घेऊन न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर केला. अपिलवरील अंतिम निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला काही कालावधी लागू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. रिमांडचा कालावधी लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय होतं प्रकरण
कानपूर देहाटच्या अमरौधा पीएचसीचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चंद्र यांची 21 जुलै 2013 रोजी रानिया येथील राही पर्यटक निवासस्थानी निर्घृण हत्या करण्यात आली होती. डॉक्टर सतीश चंद्रा एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचले होते. सायंकाळी त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आढळून आला होता. तर मुलगी बेपत्ता झाली होती.
हे वाचलं का?
हेही वाचा >> Maratha Morcha: मनोज जरांगे पाटलांची मनधरणी अपयशी, आरक्षणाची कोंडी कायम
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या हत्येची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डॉ. सतीश चंद्र यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मारेकऱ्याने डॉ. सतीश चंद्र यांचे प्रायव्हेट पार्ट कापून ते सोबत नेले होते.
प्रीती होती मुख्य आरोपी
डॉ. सतीश चंद्र यांची निर्घृण हत्या आणि त्यांचे प्रायव्हेट पार्ट गायब झाल्यामुळे ही घटना त्यावेळी खूप चर्चेत आली होती. हा गुन्हा करणाऱ्या खुन्याचा शोध घेऊन त्याला तुरुंगात टाकण्यासाठी पोलिसांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. यानंतर पोलिसांनी डॉक्टरांसह हॉटेलमध्ये आलेल्या सीटीआय गोविंद नगर, कानपूर नगरच्या प्रीती लताला अटक करून तिची तुरुंगात रवानगी केली होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> G20 Summit 2023: कोण आहे ती चिमुकली, जिने अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचे केले स्वागत
प्रकरणाच्या सुनावणीनंतर, 23 सप्टेंबर 2016 रोजी, एडीजे I च्या न्यायालयाने प्रीतीला दोषी ठरवले आणि तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रीती लता न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षा भोगत आहेत. प्रीती लता सध्या लखनौ तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
ADVERTISEMENT
डॉक्टरच्या बायकोलाच पाठवला होता प्रायव्हेट पार्ट
पोलिसांच्या चौकशीत प्रितीने सांगितले होते की, तिनेच डॉ. सतीश चंद्राची हत्या केली होती. यानंतर डॉक्टरचे प्रायव्हेट पार्ट सर्जिकल ब्लेडने कापून बॉक्समध्ये पॅक करून कुरिअरद्वारे पत्नीला पाठवले होते. कुरिअर सतीश चंद्र यांच्या पत्नीपर्यंत पोहोचताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी कुरिअर उघडताच त्यामध्ये एक चिरलेला प्रायव्हेट पार्ट सापडला. हे पाहून पोलिसही हादरले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT