पत्नीला वाटलं नवऱ्याला दुसरीही बायको, पर्दाफाश करायला गेली अन्…
एका पत्नीला पतीचं अफेअर असल्याचा संशय होता. हा संशय खरा की खोटा आहे, हे तपासण्यासाठी पत्नी डिटेक्टीव्ह बनली होती.मात्र पतीचा पर्दाफाश करताना पत्नीलाच मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय झालंय या घटनेत ते जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
देशात विवाहबाह्य संबंधांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. अशाच घटनांमुळे अनेक पती-पत्नींच्या नात्यात संशयही वाढत चालला आहे. या संशयामुळे नात्यात दुरावा देखील येत असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका पत्नीला पतीचं अफेअर असल्याचा संशय होता. हा संशय खरा की खोटा आहे, हे तपासण्यासाठी पत्नी डिटेक्टीव्ह (Detective Wife) बनली होती.मात्र पतीचा पर्दाफाश करताना पत्नीलाच मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय झालंय या घटनेत ते जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
साऊथ चायना मॉर्निग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या एका महिलेला (Women) तिच्या पतीवर (Husband) संशय होता. कारण तिचा पती प्रत्येक विकेंडला चीनमध्ये जायचा आणि तेथे एक रात्र राहून घरी पुन्हा परतायचा. साधारण एका महिन्यातले अनेक विकेंड तो अशाप्रकारे घालवायचा. त्यामुळे विकेंडचा वेळ आपल्याला आणि मुलांना न देता पती नेमका बाहेर जाऊन करतो काय असा संशय पत्नीला बळावाल होता. या संशयातून पत्नीने पतीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले होते.
हे ही वाचा : Honeymoon च्या आधी नवरीने दिल्या प्रचंड शिव्या, नेमकं घडलं काय?
पतीचा केला पाठलाग
पतीचा पर्दाफाश करण्यासाठी पत्नीने त्याचा पाठलाग करायचे ठरवले होते.पण मुलांची जबाबदारी असल्याने तिला तसे करता येत नव्हते.मात्र यात तिला तिच्या सासूची साथ लाभली.सासून मुलांच्या देखभालीची जबाबदारी घेत सुनेला नवऱ्याच्या मागे पाठवले. यावेळी पत्नीने तिच्या पतीला एका महिलेसोबन न पाहता एका टूरीस्ट गाईडसोबत पाहिले. या टूरीस्ट गाईडशी चौकशी केली असता, पती विकेंडमध्ये या ठिकाणी फ्लॅट पाहायला यायचा अशी माहिती मिळाली. पतीने तिला फ्लॅट खरेदी करण्याबाबतची माहिती दिली होती.मात्र तिने यास नकार दिला होता. त्यामुलळे नकार देऊन सु्द्धा पती नेमका कोणासाठी फ्लॅट खरेदी करतोय असा प्रश्न तिला पडला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर पोस्ट
महिलेने तिची ही संपूर्ण कहानी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते की, खरंच माझ्या पत्नीची दुसरी बायको आहे का? दुसऱ्या बायकोसाठी फ्लॅट खरेदी करायचाय का? मला त्यांना विचारायचे आहे, पण मी जर असे करेन तर त्यांना कळेल की मी त्यांचा पाठलाग केला आहे.महिलेच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिला सल्ला देत आहेत. विवाहित पुरूषाने चीनमध्ये रात्र काढणे विचित्र आहे. कारण काहीही असो, असे एका युझरने म्हटलेय. तुझा पती त्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या बायकोला लपवण्याचा प्रयत्न करतोय? असे दुसऱ्या एका य़ुझरने लिहले आहे. जर तो तुझी फसवणूक करत असेल तर त्याला सोडून दे असा सल्ला देखील एका नेटकऱ्याने दिलाय.
हे ही वाचा : बॉयफ्रेंडकडून आईचं लैगिक शोषण, गर्लफ्रेंडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा
ADVERTISEMENT