दुर्गामातेबद्दल You tuber ची असभ्य भाषा, भक्तांनी चिडून…
यूट्यूबर अमित मौर्याने दुर्गामातेबद्दल असभ्य भाषा वापरल्या बद्दल अनेक हिंदू संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करुन त्याला शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
ADVERTISEMENT
Varanasi Crime: नवरात्रोत्सवामध्ये दुर्गामातेबद्दल असभ्य भाषा वापरल्याने एका यु ट्यूबरसाठी हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. टीआरपीसाठी वाराणसीचे यूट्यूबर (You tuber) अमित मौर्याने (Amit Maurya) दुर्गामातेबद्दल असभ्य भाषेत एक व्हिडीओ करुन त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Medai) अपलोड केला होता. त्यानंतर मात्र त्यांना त्याचा चांगलाच दणका बसला आहे. कारण स्थानिक लोकांनी आणि हिंदू संघटनेच्या लोकांकडून हा व्हिडिओ अपलोड करुन व्हायरल (Video Viral) केल्याबद्दल घरातून बाहेर काढून जोरदार मारहाण करण्यात आली आहे.(youtuber amit maurya varanasi made indecent remarks maa durga people beaten)
ADVERTISEMENT
हिंदू संघटना आक्रमक
अमित मौर्याला मारहाण करत गिलाट बाजार पोलीस चौकीत घेऊन जाऊन तिथेही त्याला मारहाण केली गेली. त्यानंतर त्याच्या विरोधात हिंदू संघटनांनी लालपूर पांडेपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा >> ‘पुढं-पुढं काय होतं, सरकारने बघावंच’, जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा
अमित मोर्याला न्यायालयीन कोठडी
यानंतर पोलिसांनी यूट्यूबर अमित मौर्याला ताब्यात घेऊन हे प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्यानंतर त्याला आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
हे वाचलं का?
अनेक वादात उडी
वाराणसीच्या लालपूर पांडेपूर पोलिसातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूट्यूबर अमित मौर्या हा गेल्या काही दिवसांपासून अनेक वादविवादाबरोबर जोडला गेला आहे.
हे ही वाचा >> Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!
बनारसमध्ये तणाव
याप्रकरणी शिवसेना मंडल अध्यक्ष अजय चौबे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश आणि बनारसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याची त्यांनी शक्यता वर्तवली आहे. आपले नाव आणि प्रसिद्धी वाढवण्यासाठी अमित मौर्याने दुर्गामातेबद्दल असभ्य भाषा वापरली असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT