Sonali Phogat Case: 3 बँक खाती, 3 डायऱ्या, 3 पुरावे, बंद लॉकरमध्ये सोनाली फोगटच्या मृत्यूचे रहस्य?
सोनाली फोगट मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक शनिवारी हिसारमध्ये थाबण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते येथे पुरावे गोळा करणार आहेत. सोनाली फोगटची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत. दुसरीकडे, सुधीर पाल सांगवान याचे बंधन बँकेत खाते आहे. पोलीस अर्बन इस्टेट आणि डिफेन्स कॉलनी येथील बंधन बँकेच्या शाखेत व्यवहाराचा तपशील […]
ADVERTISEMENT

सोनाली फोगट मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक शनिवारी हिसारमध्ये थाबण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते येथे पुरावे गोळा करणार आहेत. सोनाली फोगटची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत. दुसरीकडे, सुधीर पाल सांगवान याचे बंधन बँकेत खाते आहे. पोलीस अर्बन इस्टेट आणि डिफेन्स कॉलनी येथील बंधन बँकेच्या शाखेत व्यवहाराचा तपशील गोळा करण्यासाठी गेले होते.
यापूर्वी गोवा पोलिसांच्या पथकाने सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी दोनदा भेट दिली होती. पहिल्या दिवशी केवळ दीड तास छाननी केली, मात्र एकही पुरावा हाती लागला नाही. 4 तास चौकशी आणि तपासानंतर दुसऱ्या दिवशी तीन डायरी घेऊन लॉकर सील करण्यात आले.
सोनाली फोगटच्या तीन डायरी गोवा पोलिसांच्या हाती लागल्या असून, गेल्या 4 दिवसांपासून हिसारमध्ये धुमाकूळ घालत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या डायरीमध्ये फक्त सोनाली फोगटची भाषणं, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन नंबर आणि काही खर्च आहे. लॉकर सील करण्यासोबतच गोवा पोलिसांच्या पथकाने या डायरी सोबत घेतल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटमध्ये सोनालीचा मृत्यू झाला होता.
सोनालीच्या लॉकरचा पासवर्ड सुधीरकडे होता
सोनालीच्या लॉकरचा पासवर्ड सुधीर सांगवानला माहीत होता. गोवा पोलिसांशी व्हिडीओ कॉलवर चौकशीदरम्यान त्याने दोन पासवर्ड दिले होते. यामध्ये एक पासवर्ड तीन अंकी आणि दुसरा सहा अंकी होता. मात्र, या दोन्ही पासवर्डने लॉकर उघडले नाही. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लॉकर सील केले.