कोण आहे लेडी डॉन शाइस्ता परवीन, काय आहे तिच्याकडे गुपित?
अतिक अहमदची पत्नी म्हणजेच लेडी डॉन शाइस्ता परवीन ही सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडारवर आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना ती सापडू शकलेली नाही. जाणून घ्या तिच्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: अतिक अहमद (Atiq Ahmed) जेलमध्ये गेल्यानंतर उदय झाला लेडी डॉन शाइस्ता परवीनचा. वॉण्टेड क्रिमिनल यादीत असलेली शाइस्ता लोकांना धमकावणं, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं.. या सगळ्या गोष्टी बड्या खुबीने करायची. हीच शाइस्ता आता उत्तर प्रदेशांच्या (Uttar Pradesh) मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये आहे. पोलिसाच्या घरात जन्माला आलेल्या शाइस्ताचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात गुंडांच्या यादीत नाव कसं आलं आणि उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सलाही गुंगारा देणारी, उमेश पाल हत्याकांडात आरोपी असणारी ही लेडी डॉन शाइस्ता परवीन आहे कोण? अतिक अहमदची गँग कशी सांभाळायची शाइस्ता? याचविषयी आपण जाणून घेऊया.
अतिक अहमदच्या शूट आउटनंतर आता उत्तर प्रदेशची स्पेशल टास्क फोर्स शाइस्ता परवीनचा शोध घेतेय. अतिकच्या मृत्यूनंतर अतिकच्या काळ्या कारनाम्यांची सारी माहिती शाइस्ताकडे असल्याने पोलीस तिचा शक्य त्या सर्व ठिकाणी शोध घेताहेत. शाइस्ताचं माहेर असलेल्या चकीयामध्येही पोलिसांनी छापे मारले. पण शाइस्ताची माहेरची माणसं घर उघडंच ठेवून गायब झाल्याचं पोलिसांना आढळलं.
शाइस्तासाठी कौसंबी, ग्रेटर नॉएडा, मेरठ, दिल्ली, ओखला, पश्चिम बंगाल आणि मुंबईतही पोलीस शोध घेताहेत. ही लेडी डॉन पोलिसांसाठी महत्त्वाची का झालीय? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्याचं उत्तर पुढे आहे.
गृहिणी ते लेडी डॉन
शाइस्ता परवीनचा विषय येतो त्याबरोबर उमेश पाल हत्याकांडाचा विषय येतोच. कारण उमेश पाल हत्याकाडांनंतर तिसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला शाइस्ता परवीनने लिहिलेली एक चिट्ठी आता व्हायरल होत आहेत. ज्यात शाइस्ताने अतिक आणि त्याच्या मुलांच्या सुरक्षेची मागणी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली होती.