यवतमाळ : गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न, नराधम बापासह 8 जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– भास्कर मेहरे, यवतमाळ प्रतिनीधी

गुप्तधनाच्या लालसेपोटील आपल्या पोटच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला असून बाभुळगाव तालुक्यातील मादणी येथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या बापासह 8 आरोपींना अटक केली असून यात दोन महिलांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मुलीचा वडील हा गुप्तधनाच्या मागे लागला होता. घरी गुप्तधन असल्याचं सांगत बापाने बाहेरील मंडळींना बोलवून घरात पुजापाठ करण्याचा डाव आखला. यासाठी मुलीच्या बापाने विजय बावणे, रमेश गुडेकार यांच्यासह राळेगाव येथील वाल्मिक वानखेडे, विनोद चुणारकर,  दिपक श्रीरामे, आकाश धनकसार, माधुरी ठाकूर, माया संगमनेरकर यांना मादणी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास बोलावुन घेतले. यानंतर बापाने आपल्या दोन मुलींना आणि बायकोला एका खोलीत बंद करुन बापाने पुजापाठ करायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आईसक्रीम देऊन 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन हत्या, आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत

या पुजेदरम्यान मुलीचा बाप वाल्मिकी नावाच्या मांत्रिकाशी बोलत होता. यावेळी वाल्मिकी याने गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल असं मुलीच्या बापाला सांगितलं. यानंतर नराधम बाप आपल्या मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाला. सुदैवाने हा सर्व प्रकार मोठी मुलगी आतल्या खोलीत लपून पाहत होती. प्रसंगावधान राखून तिने नरबळीसाठी खोदलेल्या खड्ड्याचा फोटो काढत यवतमाळमधील आपल्या मित्राला पाठवून आपला जीव धोक्यात असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

मुलीच्या मित्राकडून फोटो मिळाल्यानंतर बाभुळगाव आणि यवतमाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने मादणी येथे घटनास्थळी छापेमारी करत अनुचित प्रसंग होण्यापासून टाळला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी नराधम बापासह 8 जणांना अटक केली असून नरबळीसाठी वापरण्यात आलेलं कुदळ, फावडं, टोपली, पुजेचं साहित्य, चाकू, सुरी इत्यादी साहित्य जप्त केलं.

ADVERTISEMENT

बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपले वडील लहानपणापासून आपल्यावर शारिरिक अत्याचार करत असल्याचं सांगितलं. मुलगी मोठी झाल्यानंतर बाहेरगावी शिकायला गेलेली असताना सुट्टीत घरी आल्यानंतरही वडील आपल्यावर अत्याचार करायचे. याबद्दल कोणालाही सांगितलं तर जिवे मारायची धमकी मिळायची असंही मुलीने सांगितली. आईची तब्येत सतत आजारी असल्याचा फायदा वडील घ्यायचे. ज्यानंतर त्यांनी गुप्तधनाच्या लालसेपोटी आपल्याच मुलीला संपवण्याची योजना आखली. यवतमाळ पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT