Maharashtra Exit Poll: महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा, मविआची भरारी!
ABP C-Voter Exit Poll Result for Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र भाजपची डोकेदुखी वाढवत आहे. एबीपी सी-व्होटर एक्झिट पोलनुसार मविआ एनडीएला जोरदार टक्कर देत असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
ABP C-Voter Exit Poll: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 चं अखेर आज (1 जून) सूप वाजलं आहे. कारण की, मतदानाचा शेवटचा टप्पा आणि सातवा टप्पा आज पार पडला आहे. त्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे हे समोर येऊ लागले आहेत. नुकतंच ABP C-Voter चा महाराष्ट्रातील एक्झिट पोल हा समोर आला आहे. ज्यामध्ये भाजप आणि एनडीएला जोरदार झटका बसत असल्याचं दिसत आहे. तर महाविकास आघाडी राज्यात भरारी घेत असल्याचं दिसतंय. (abp c voter exit poll result for maharashtra lok sabha election 2024 bjp shiv sena shinde ncp ajit pawar mahayuti congress shiv sena ubt ncp sharad pawar seats in opinion poll result)
ADVERTISEMENT
Maharashtra Exit Poll Result 2024 Live: एबीपी-सी व्होटरचा महाराष्ट्रातील एक्झिट पोल जसाच्या तसा..
एबीपी-सी व्होटरनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 ते 26 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात.
- भाजप - 17
- शिवसेना (शिंदे गट)- 06
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 01
असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Exit Poll : 'इंडिया आघाडी'ला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात किती मिळणार जागा?
दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला राज्यात एकूण 23 ते 24 जागा मिळू शकतात. हा आकडा इंडिया आघाडीसाठी नक्कीच दिलासादायक ठरू शकतो.
- काँग्रेस - 08
- शिवसेना (ठाकरे गट)- 09
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06
याशिवाय 1 जागा ही अपक्षाला मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Maharashtra Exit Poll Result 2024 Live : महायुतीचा तब्बल 21 जागांवर पराभव?, महाराष्ट्राचा पहिला Exit Poll
जर या एक्झिट पोलचा आपण विचार केल्यास महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही मोठी मुसंडी मारत असल्याचं दिसतं आहे. कारण 2014 आणि 2019 साली महाराष्ट्रातून भाजप-एनडीएला मोठं यश मिळालं होतं. या दोन्ही लोकसभा निवडणुकीत एनडीएला 40 हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर जे एक्झिट पोल समोर येत आहे त्यानुसार मात्र भाजपप्रणित एनडीएला मोठा झटका बसतोय. कारण त्यांच्या युतीला केवळ 22 ते 26 जागाच मिळू शकतात.
ADVERTISEMENT
म्हणजेच महाराष्ट्रात एनडीएला 20 हून अधिक जागांचा फटका बसत असल्याचं दिसतं आहे. आता एक्झिट पोलचे नेमके आकडे कितपत खरे ठरतात हे आपल्या निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला समजणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT