Yugendra Pawar : अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेरलं, बारामतीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar party worker surrouded yugendra pawar ask question on trolling shrinivas pawar
अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घेत जाब विचारला
social share
google news

Yugendra Pawar Video : वसंत मोरे, बारामती : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढाई होणार आहे. या लढाईत शरद पवारांच्या बाजूने संपूर्ण पवार कुटूंब उभं आहे. तर अजित पवार कुटुंबात मला एकटे पाडल्याचा आरोप करतात. अशात अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या बाजूने कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत आहे. अशाच भेटीगाठी दरम्यान अजित पवारांच्या (Ajit Pawar) काही कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) घेरल्याची घटना घडली आहे. या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या? हे जाणून घेऊयात. (ajit pawar party worker surrouded yugendra pawar ask question on trolling shrinivas pawar) 

ADVERTISEMENT

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचारासाठी सोमेश्वरनगर परिसरात गेले होते. यावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घेतला होता. खरं तर अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी खालच्या पातळीवर जाऊन अजितदादांवर टीका केली होती. या टीकेनंतर सोशल मीडियावर रान उठवण्यात आले होते. याचाच जाब विचारण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरलं होतं.

हे ही वाचा : Ajit Pawar : 'आम्ही आरेला कारे करु शकतो, पण...',

यावेळी अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घेत जाब विचारला. सोशल मीडियावरून अजित पवारांना नालायक शब्द वापरून टीका केली जात आहे. या संबंधित तक्रारी कार्यकर्त्यांनी यावेळी केल्या. "आमच्यासाठी पवार कुटुंब आदर्शस्थानी असून आपले कार्यकर्ते अजितदादा यांची बदनामी करत आहेत असा जाब विचारला. शरदचंद्र पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांनी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू असे आश्वासन अजितदादा यांच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर युगेंद्र पवार यांनी तेथून काढता पाय घेतला.

हे वाचलं का?

श्रीनिवास पवार काय म्हणाले होते? 

काटेवाडीत बोलत असताना श्रीनिवास पवार म्हणाले की, 'मी आजवर अजित पवारांसोबत होतो. मी नेहमी त्यांना साथ दिली. आमच्यावर शरद पवार साहेबांचे खूप उपकार आहे. जे काही पदे मिळाली ते शरद पवार साहेबांमुळेच मिळाली. त्यांचे वय  देखील आता 83 आहे. अशावेळी शरद पवार साहेबांची साथ सोडणं मला अजिबात पटलं नाही. मी चांगल्या वाईट काळात अजित पवारांना साथ दिली आम्ही चर्चा केली. 

हे ही वाचा : MNS BJP Alliance : राज ठाकरेंची एन्ट्री, महायुतीत कुणाची जाणार विकेट?

स्वार्थासाठी जो घरातल्या वयस्कर माणसाची किंमत करत नाही, त्याच्यासारखा नालायक माणूस नाही. अशी टीका त्यांनी केली. भाजपला शरद पवार हे नाव संपवायचं होतं, त्यामुळे त्यांनी अजित पवारांना फोडलं. शेत आपल्या नावावर केलं म्हणून आई-वडिलांना घराबाहेर काढायचं नसतं, साहेबांमुळे आतापर्यंत अनेक पदे मिळाली, त्यांच्यावर टीका करणं मला पटणारं नाही.' असंही यावेळी श्रीनिवास पवार म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT