Baramati Lok Sabha : सुप्रिया सुळे की, सुनेत्रा पवार... सट्टा बाजाराचा अंदाज काय सांगतोय?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल सट्टा बाजाराचा अंदाज काय आहे?
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध
social share
google news

Baramati Lok Sabha elections 2024 Prediction : महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागलेल्या... अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार? याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. मतदानापूर्वी समोर आलेल्या काही ओपिनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे जिंकणार, असे अंदाज व्यक्त करण्यात आले. तर काही ओपिनियन पोलमध्ये सुनेत्रा पवार जिंकणार असे म्हटले गेले. पण, आता बारामतीमध्य निवडणूक पार पडली आहे. ४ जून रोजी निकाल येणार असून, त्यापूर्वीच सट्टा बाजाराचा अंदाज समोर आला आहे. (Betting market prediction about Baramati lok sabha election 2024 Result)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अशी लढत होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्या, तरी काका विरुद्ध पुतण्या असेच या लढतीकडे बघितले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाची सगळ्यांना उत्सुकता आहे. 

सट्टा बाजाराचा अंदाज काय?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल वेगवेगळे अंदाज निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता मुंबईतील सट्टा बाजाराचा अंदाजही समोर आला आहे. सट्टा बाजाराने देशातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील निकाल काय असतील, याबद्दल अंदाज व्यक्त केले आहेत. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

हेही वाचा >> महाविकास आघाडी महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज 

सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अजित पवारांसाठी धक्का देणारा असेल. बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी होतील, असा अंदाज सट्टा बाजाराचा आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते. बारामतीत 59.50 टक्के मतदान झाले आहे. 

ADVERTISEMENT

विधानसभा मतदारसंघातील गणित, सहानुभूतीचा फॅक्टर

बारामती लोकसभा मतदारसंघात स्थानिक समीकरणे या निवडणुकीत महत्त्वाची ठरली. खडकवासला, दौंड, भोर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात. 

बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजपने स्थानिक समीकरणे जुळवून आणली होती, पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा फायदा किती झाला, हे निकालातूनच समोर येणार आहे.

हेही वाचा >> शिंदे 'ही' जागा जिंकणार; सट्टा बाजाराने ठाकरेंची वाढवली चिंता

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर अजित पवार यांनी पक्ष बळकावल्याने शरद पवारांबद्दल राज्यात सहानुभूती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातही याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल, असे विश्लेषकांचे अंदाज आहे. पण, भाजपच्या मदतीने अजित पवारांनी आखलेली रणनीती बारामती लोकसभेत किती यशस्वी होणार, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT