Lok Sabha Elections 2024 : नाशिकची जागा भाजपला का हवीये, गोडसेंची उमेदवारीच धोक्यात!
Nashik Lok Sabha BJP Shiv Sena : नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहील असे म्हटले जात होते. पण, आता भाजपने या जागेसाठी आग्रह धरला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघावरून पेच
भाजपच्या इच्छुकांनी आणि आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट
हेमंत गोडसेंची उमेदवारी राहणार की, जाणार?
Nashik Lok Sabha Elections 2024, Hemant Godse : आचारसंहिता जाहीर होवूनही नाशिक मतदारसंघात महायुती आणि महविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले नाही. महाविकास आघडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे. पण, महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. याची पहिल्यांदा प्रचिती आली हेमंत गोडसे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरील शक्तिप्रदर्शनातून!
ADVERTISEMENT
गोडसेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर भाजपच्या सर्व आमदार व पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मतदारसंघावर दावा केला. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी समर्थक आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह रविवारी मुख्यमंत्री याच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यांनी एकनाथ शिंदे निवासस्थानी जाऊन यांची भेट घेतली.
गोडसे जागेसाठी आग्रही
हेमंत गोडसे हे सांगतात की, "ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे, इथे धनुष्यबाणच हवा, ही कार्यकर्त्यांची भावना होती म्हणून शिंदे साहेबांची भेट घेतली. वरिष्ठ स्तरावर चर्चेअंती महायुती उमेदवार जाहीर करेल, पण आम्ही भावना पोहचवल्या आहेत."
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवार खरंच सुप्रिया सुळेंविरोधातील उमेदवार बदलणार?
दुसरीकडे 3 आमदारांसह नाशिकच्या भाजपमधील इच्छुकांनी सोमवारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत नाशिकच्या जागेसंदर्भात स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. इच्छुक उमेदवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भुजबळांची एन्ट्री
भाजप-शिवसेना नाशिकसाठी आग्रही असताना मंत्री छगन भूजबळ समर्थकांनी कार्य योद्धा छगन भुजबळ असा टीजर व्हायरल केला. भुजबळ यांनी यावर म्हटले की, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका असते की, त्यांच्या पक्षाला तिकीट मिळावे. भुजबळ यांनी असेही म्हटले की, आम्हाला शिंदे गटा इतक्याच जागा मिळाव्यात. नाशिक आणि सातारा जागेवरही त्यांनी दावा केला आहे. त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे.
ADVERTISEMENT
भाजपला का हवीय नाशिकची जागा?
नाशिकला भाजपाची ताकद अधिक आहे, असे सांगत 3 आमदारांसह नाशिकच्या जिल्हा कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केली. इच्छुक उमेदवार केदार आहेर आणि दिनकर पाटील यांनी संगितले की, "विचार केला तर आमचे तीन आमदार, 100 नगरसेवक आहेत. अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहेत."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> मविआ 'वंचित'ला देणार 'इतक्या' जागा; चेंडू ठाकरे-पवारांच्या कोर्टात
"आमच्या सर्वांची ही मनापासूनची इच्छा की, नाशिकची जागा भाजपला मिळावी, हा शेवटचा टप्पा असल्याने फडणवीस यांच्याकडे आम्ही गेलो", असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर महायुतीत जोरदार 'वाक्'युद्ध बघायला मिळत आहे. एकंदरीत नाशिक लोकसभा हा महत्त्वाचा मतदारसंघ असून, महायुतीमधील धुसफूस वाढली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT