Shiv Sena UBT : भाजपचा खासदार ठाकरेंनी फोडला; 'या' मतदारसंघातील समीकरणे बदलली?

मुंबई तक

BJP Mp Unmesh Patil Meet Sanjay Raut : जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची माहिती आहे. या नाराजीतून उन्मेश पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

उन्मेश पाटील उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
bjp mp unmesh patil will join udhhav thackeray shiv sena ubt sanjay raut smita wagh bjp candidate
social share
google news

BJP Mp Unmesh Patil Meet Sanjay Raut : मनीष जोग, जळगाव : जळगावमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे खासदार उन्मेश पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपने लोकसभेचे तिकीट कापल्याने उन्मेश पाटील नाराज आहेत. या नाराजीतून उन्मेश पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता उन्मेश पाटील उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.  (bjp mp unmesh patil will join udhhav thackeray shiv sena ubt sanjay raut smita wagh bjp candidate) 

जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची माहिती आहे. या नाराजीतून उन्मेश पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान आज मुंबईत येऊन उन्मेश पाटलांनी खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्या उन्मेश पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेते पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : Narayan Rane : ''लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार''

दरम्यान राऊतांसोबत झालेल्या भेटीनंतर बोलताना उन्मेश पाटील म्हणाले की, ''मी आरामात तुमच्याशी बोलेन, आता बोलण्यासारख काही नाही आहे. मी उद्या सकाळी तुमच्याशी बोलेन. माझी आणि राऊत साहेबांची मागच्या अनेक वर्षापासून ओळख आहे. आम्ही एकत्र संसदेत होतो, आमची चांगली मैत्री आहे. काही गोष्टी राजकारणापलिकडे असतात, तशीच ही भेट होती'', असे उन्मेश पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान जळगाव लोकसभेची जागा महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आली आहे. आणि या जागेवरून अद्याप उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या उन्मेश पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे जर झाल्यास उन्मेष पाटील विरूद्ध भाजपाच्या स्मिता वाघ अशी लढत होण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp