Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळ नाराज?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

chhagan bhujbal upset on ajit pawar ncp rajya sabha candidate sunetra pawar ncp politics
राज्यसभेची जागा ही सर्व सहमतीने सुनेत्रा पवार यांना देण्याचे बैठकीत ठरलं आहे.
social share
google news

Chhgan Bhujbal On Rajya Sabha :  अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेसाठी आज सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर आता राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. नेमक्या त्यांच्या नाराजीचे कारण काय आहे? हे जाणून घेऊयात. (chhagan bhujbal upset on ajit pawar ncp rajya sabha candidate sunetra pawar ncp politics) 

मुंबई तकच्या रिपोर्टरने छगन भुजबळ यांच्याशी बातचीत केली आहे. यामध्ये भुजबळ म्हणाले,  मी राज्यसभेसाठी जरूर इच्छुक होतो. मात्र राज्यसभेची जागा ही सर्व सहमतीने सुनेत्रा पवार यांना देण्याचे बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे मी नाराज नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. 

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : महायुतीत 'बिघाडी'! उद्धव ठाकरे-काँग्रेसने घेतले जुळवून

पक्षाचे सर्व निर्णय अजित पवार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेच घेतात का तुम्हाला डावलले जाते का? असा भुजबळ यांना करण्यात आला होता. यावर ते म्हणाले, सध्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आहेत आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. मला डावलण्यालं जाण्याचा प्रश्नच नाही. कालच्या बैठकीला मी स्वतः होतो उपस्थित. हा निर्णय सर्वानुमते झाला असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पराभूत उमेदवाराला बॅकडोर एन्ट्री दिली जाते का? यावर भुजबळ म्हणाले, जो पक्षाचा निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे. ऑर्गनायझर मधून अजित पवारांवर टीका केली. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे भाजपचे नुकसान झाले असे म्हटले जाते. यावर भुजबळ म्हणाले, ते म्हणतात ते खरं असेल तर देशाच्या अन्य भागात काय झालं? उत्तर प्रदेश मध्ये काय झालं? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. 

हे ही वाचा : "तीन महिन्यांनी मी राज्य तुमच्या हातात देतो", पवारांकडून सूचक संकेत

    follow whatsapp

    ADVERTISEMENT