Eknath Shinde : 'जरा जपून बोला', CM शिदेंनी टोचले शिवसेना नेत्यांचे कान

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

cm eknath shinde mps meeting worli dom lok sabha election 2024 target udhhav thackeray shivsena mahayuti seat sharing maharashtra politics
मित्र पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नका.
social share
google news

Eknath Shinde Worli Meeting, Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.मात्र अद्याप महायुतीच जागावाटप जाहीर झालं नाही आहे. अनेक जागांवर महायुतीच्या घटक पक्षातच पेच आहेत. यावर अनेक नेते उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. खासकरून विजय शिवतारेंनी बारामतीतून बंडाचा झेडा फडकवला आहे. त्यामुळे महायुतीतील धुसफुस प्रचंड वाढली आहे. ही धुसफुस टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी खासदारांची आणि नेत्यांची बैठक बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिंदेंनी खासदारांना अनेक सूचना देत सक्त ताकीद दिली आहे.  (cm eknath shinde mps meeting worli dom lok sabha election 2024 target udhhav thackeray shivsena mahayuti seat sharing maharashtra politics)

वरळीतील NSCI डोममध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक सुरु आहे. या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नेतेमंडळी उपस्थित आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नेत्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबतची रणनीती सांगितली आहे. राज्यात महायुती सरकार आहे. त्यामुळे मित्र पक्षाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेऊ नका. तसेच पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही, असे स्पष्ट आदेश एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिले आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : काँग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे का नाही? राहुल गांधींनी दिले उत्तर

विरोधी पक्षातील नेते खालच्या पातळींवर टीका करत आहेत. पण आपण आपली पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायच्या नाहीत, त्यांचा खरा चेहरा समोर आणा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदारांना दिल्या आहेत. तसेच विरोधकांना एक्सपोज करा असे शिंदेंनी खासदारांना म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 खासकरून यात शिंदेंनी ठाकरेंना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणत नाहीत, शिवाजी पार्कला हिंदू बांधव भगिनी म्हणायची त्यांना लाज वाटते, बाळासाहेबांच्या इच्छेविरूध्द वागतात, 2019 साली त्यांनी जनमताचा अनादर केला. अशा सगळ्या मुद्यावरून ठाकरेंना आगामी लोकसभेत घेरण्याच्या सूचना शिंदेंनी खासदार, नेत्यांना दिल्या आहेत. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : 'वंचित'शिवाय 'मविआ' करणार जागावाटप?

मराठा समाजाला महायुती सरकारने मराठा आरक्षण दिलं आहे. कोर्टात टीकणार हे आरक्षण असणार आहे. तसेच सरकारने मराठा समाजाला न्याय दिलाय आणि ओबीसींवर अन्याय केला नाही. या आरक्षणावरून पोलीस भरती होणार आहे. अडीच वर्ष सरकार घरी बसलं होतं गेल्या दोन वर्षात शासन लोकांच्या दारी गेले आहे. सरकारने केलेली कामं जनतेसमोर मुद्देसुद मांडा, अशा सूचना शिंदेंनी खासदारांना केला आहे. दरम्यान गेल्या 50-60 वर्षात कॉंग्रेसने काय केले होते आणि गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने काय केलं आहे. हे जनतेला पटवून सांगा,असा सगळ्या सूचना एकनाथ शिंदे यांनी खासदारांना केल्या आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT