Lok Sabha Election 2024 : लोकसभेआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार?, फडणवीसांनी दिले संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis big statement on maharashtra politics lok sabha election 2024 maha vikas aghadi vs mahayuti
लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप होणार
social share
google news

Devendra Fadnavis Big statement : व्यंकटेश दुदमवार, गडचिरोली :  लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच जागावाटप अद्याप जाहीर झालं नाही आहे. ठाकरे गटाकडून आज 17 जागेंवर उमेदवार जाहीर झाले आहेत. पण अजून 5 जागांवर उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. तसेच अनेक जागांवर महाविकास आघाडीतच धुसफुस सुरु आहे. असे असताना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील, असे विधान फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  (devendra fadnavis big statement on maharashtra politics lok sabha election 2024 maha vikas aghadi vs mahayuti) 

देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून टाकणारे विधान केले आहे. पत्रकारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर फडणवीसांना प्रश्न विचारला होता. यावेळी फडणवीसांनी 'महाविकास आघाडीत सगळेच एकमेकांच्या जागेवर उमेदवार जाहीर करतायत. ही सगळी परिस्थिती पाहून अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील' असे मोठं विधान फडणवीसांनी केले आहे.फडणवीसांच्या या विधानाने लोकसभेआधी राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Madha Lok Sabha Elections 2024 : माढासाठी पवारांचा नवा डाव

प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आज मनोज जरांगे पाटलांसोबत आघाडी केली आहे. राज्यातील या नवीन आघाडीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, वंचितचे आणि त्यांच काय आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काही बोलायचे नाही, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान महाराष्ट्रातील जागावाटपावर बोलायच झालं तर महायुती आघाडीतून भाजपने आतापर्यंत 23 जागा जाहीर केल्या आहेत. तर अद्याप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकही यादी जाहीर केली नाही आहे.  

हे ही वाचा : शिवसेना खासदाराचं तिकीट कापलं; शिंदे 'इथेही' उमेदवार बदलणार?

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसने 7 जागांवर उमेदवार जाहीर केले होते.तर आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. बाकी इतर जागांवर महाविकास आघाडीत वाद असल्या कारणाने त्या जाहीर झाल्या नाही आहेत. त्यामुळे आता जागावाटत महाविकास आघाडीतील धुसफुस पाहता देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खरा ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT