Madha Lok Sabha Elections 2024 : माढासाठी पवारांचा नवा डाव, मोहिते पाटील हाती घेणार तुतारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

madha lok sabha election 2024 sharad pawar ncp amol kolhe meet dhairyshil mohite patil shivratn bunglow ranjitsingh nimbalkar bjp candididate
मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे.
social share
google news

Amol kolhe Meet Mohite Patil, Madha Lok Sabha Election 2024 : नितीन शिंदे, सोलापुर :  माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा काही केल्या सुटता सुटत नाही आहे. त्यात आता शरद पवारांनी मोठा डाव टाकला आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोहित पाटलांच्या शिवरत्नवर जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मोहिते पाटलांनी (Dhairyshil Mohite patil) तुतारी हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यामुळे रणजितसिंह निंबाळकर (ranjitsingh nimbalkar) आणि भाजपला ही निवडणूक अडचणीची जाणार आहे. (madha lok sabha election 2024 sharad pawar ncp amol kolhe meet dhairyshil mohite patil shivratn bunglow ranjitsingh nimbalkar bjp candididate) 

भाजपने माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली होती. या  उमेदवारीला निंबाळकर आणि मोहिते पाटलांचा विरोध होता. हा विरोध मावळण्यासाठी देवेद्र फडणवीसांनी देखील प्रयत्न केले. मात्र तरी देखील मोहित पाटील आणि निंबाळकर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. 

हे ही वाचा : जरांगेंसोबत आंबेडकरांचा काय ठरला प्लॅन ; 'मविआ'चा होणार गेम? 

आज अखेर माढा मतदार संघात राजकीय हालचालिंना वेग आला होता. भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी आज शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परिचारकांच्या या प्रयत्नांना यश आले नाही. आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या भेटीगाठीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे शिवरत्नवर दाखल झाले होते.  या भेटीत मोहिते पाटलांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढावी, असा प्रस्ताव अमोल कोल्हे  यांनी शरद पवारांच्या वतीने मोहिते पाटलांसमोर ठेवला होता. तसेच मोहित पाटलांसोबत झालेली भेट ही राजकीय भेट नव्हती,असे  अमोल कोल्हे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची यादी कधी जाहीर होणार यावर अमोल कोल्हे यांनी बोलणं टाळलं आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT : 'मविआ'च्या डीलमध्ये ठाकरेंना फायदा की फटका?

दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. तसेच मोहिते पाटलांना गावभेटी दरम्यान कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता कार्यकर्त्यांची तुतारीची मागणी आणि शरद पवारांच्या या ऑफरवर आता मोहिते पाटील काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

माढ्यात तुतारी आम्ही वाजवणारच

या बैठकीवर विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधु जयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे आता विजयदादा आणि पवार साहेबांमध्ये बैठक होईल. त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल, असे जयसिंह मोहिते पाटलांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

तुतारी वरून आम्ही का गप्प होतो? कारण पवार साहेबांसोबत चर्चा झाली नव्हती. त्यामुळे चर्चेशिवाय काहीही बोलणे चुकीचे आहे. म्हणून धैर्यशील देखील गप्प होते. तसेच माढा मतदार संघात भापजविरोधात त्सुनामी आली आहे. रणजीत दादा फडणवीसांसोबत फिरतोय. फडणवीसांनी त्यांना सहकार्य केलं. त्यांना कसं डावलायच हा नैतिक प्रश्न त्यांना पडला असेल. फडणवीस साहेब आम्हाला ओळखत नाही. पण आम्ही ना भाजपचे ना राष्ट्रवादीचे आमचा पक्ष फक्त विजयदादा. आमच्या मतदार संघात कुणी कमलाचे नाव काढत नाही, सगळे तुतारी वाजवा म्हणतात. त्यामुळे ती तुतारी आम्ही वाजवणारच, असे स्पष्ट संकेत जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT