Hingoli Lok Sabha election : "उमेदवारी जाहीर करायला नको होती", हेमंत पाटलांनी व्यक्त केली खदखद

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिकीट रद्द करण्यात आले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार बदलला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणूक

point

हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बदलला उमेदवार

point

शिवसेनेनेे बाबूराव कदम कोहळीकर यांना दिले तिकीट

Hingoli lok sabha election 2024, Hemant Patil : हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली. त्यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं. यामुळे हेमंत पाटील नाराज झाले. प्रचार सुरू केल्यानंतर पत्ता कापण्यात आल्याने पाटलांनी याबद्दलची खदखद व्यक्त केली. (Hemant patil disappointed after withdrew his nomination from hingoli lok sabha by shiv sena) 

ADVERTISEMENT

बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोली येथे हेमंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. बाबूराव कदम यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "मी बाबूराव कदम यांचे अभिनंदन करतो. ते माझे वर्गमित्र आहेत. ते मी घडवलेला कार्यकर्ताही आहे. त्यांना दोन वेळा जिल्हाप्रमुख पदावर बसवता आले. आम्ही सगळेजण एकाजीवाने काम करून त्यांना निवडून आणू." 

मला सांगितलं की, काही अडचणी आहेत -हेमंत पाटील 

उमेदवारी जाहीर करून नंतर तिकीट कापल्याबद्दल हेमंत पाटलांना नाराजी लपवता आली नाही. ते म्हणाले, "माझी पहिली भावना ही आहे की, एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती. ठीक आहे, पक्षाने उमेदवारी जाहीर केली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. वरिष्ठांच्या, पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात."

हे वाचलं का?

हेही वाचा >> शिंदेंनी 2 खासदारांची तिकीट कापली 

याच मुद्द्यावर हेमंत पाटील पुढे म्हणाले की, "तीन पक्षांचं हे एकत्रित सरकार चालत आहे. काही तडजोडी असतात. हे करत असताना त्यांच्या एक जवळचा सहकारी या नात्याने त्यांनी मला सांगितलं की, काही अडचणी आहेत. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. निश्चित वाईट तर वाटतंच, परंतू पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. निश्चित ही जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे", असंही पाटील यांनी सांगितलं.

राजश्री पाटील लढवणार की नाही?

शिवसेनेकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याबद्दल हेमंत पाटील म्हणाले, "खरं म्हणजे मी त्यांच्याकडून  (एकनाथ शिंदे) कोणतंही आश्वासन घेतलं नाही किंवा मागणारा कार्यकर्ता नाही. योग्य वेळ आल्यानंतर जी काही जबाबदारी देतील, ती देतील. माझ्या पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की, यवतमाळमधून उभं करण्याच्या संदर्भात... पण, यासंदर्भात आम्ही परिवार एकत्र बसलेलो नाही."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिवसेनेमुळे भाजपला कापावं लागलेलं सोमय्यांचं तिकीट, आता BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला...

"कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे. नाराजी आहे. हे सगळं समजावणं, मिटवणं हे सगळं चालू आहे. आणि मी आता माझ्या घरी आईवडिल, बहीण, पत्नी यांच्यासोबत बसून निर्णय घेणार आहे. एकत्रित बसू परिवार म्हणून ठरवू. कारण शेवटी मला घर परिवारालाही विचारलं पाहिजे", असे सांगत त्यांनी राजश्री पाटलांच्या निवडणूक लढवण्याबद्दल अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT