Maharashtra Lok Sabha : ठाकरेंचा सांगलीत 'गेम'; काँग्रेसचा मेसेज, विशाल पाटलांना ताकद?
Sangli Lok Sabha election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी तिहेरी लढत झाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

विशाल पाटील विरुद्ध संजयकाका पाटील

उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना दिली आहे उमेदवारी
Sangli Lok Sabha Election 2024 : राज्यात महायुतीविरोधात एकास एक उमेदवार द्यायचा, असं ठरवत महाविकास आघाडीनं जागावाटप निश्चित केलं. पण, एका मतदारसंघात हे सपशेल अपयशी ठरलंय. तो मतदारसंघ अर्थातच सांगली लोकसभा. ठाकरेंनी सांगलीची जागा बळकावली, पण ती राखणे अवघडच असल्याचेच दिसत आहे. कारण काँग्रेसने आतून विशाल पाटलांनाच साथ दिल्याची चर्चा आहे. मतदान झाले तरी विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने कार्यकर्त्यांना मेसेज दिल्याचेही म्हटले जात आहे. नेमकं आता ठाकरेंचा सांगलीत गेम कसा झाला, हेच समजून घ्या. (there is buzzing that, Uddhav Thackeray's Shiv Sena did not get full support from Congress in Sangli Lok Sabha constituency)
काँग्रेसची मते विशाल पाटलांच्या बाजूने पडली?
विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशीच चर्चा या मतदारसंघात होत राहिली. पण, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीत संघटन नसताना ठाकरेंनी हा मतदारसंघ ज्या पद्धतीने काँग्रेसकडून काढून घेतला, त्याची नाराजी आता भोवणार असं दिसत आहे. याच कारण म्हणजे काँग्रेसच्या मतदाराची नाराजी. दुसरी गोष्ट म्हणजे विशाल पाटलांवर कारवाई करण्याचे काँग्रेसने टाळले आहे.
"महाविकास आघाडी एकजूट आहे आणि सांगलीची जागा आम्ही शिवसेनेला दिली आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सांगलीत आमचं समर्थन शिवसेनेच्या उमेदवाराला आहे. कोल्हापूरचा उमेदवार इतका महत्वाचा नव्हता", असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.
हेही वाचा >> "तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहिल", कदमांचं तुफान भाषण
चेन्निथला यांच्या विधानाचा अर्थ काढायचा झाला, तर विशाल पाटील काँग्रेससाठी किती महत्त्वाचे आहेत, हे समजून येतं. विशाल पाटलांनी बंड केलं, ते मूळात ठाकरेंनी जागा हिरावून घेतल्यामुळे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. अशात त्यांच्यावर कारवाई केली, तर पक्षातील नव नेतृत्वापर्यंत वाईट मेसेज जाईल, अशीही भीती काँग्रेसला होती, असे विश्लेषक सांगतात.