Lok Sabha Election 2024: पटेल, पटोलेंची प्रतिष्ठा पणाला! बंडखोर कुणाच्या अडचणी वाढवणार?

निलेश झालटे

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आता प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर काय आव्हानं आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

पटेल, पटोलेंची प्रतिष्ठा पणाला!
पटेल, पटोलेंची प्रतिष्ठा पणाला!
social share
google news

Lok Sabha Election 2024 Bhandara-Gondiya: भंडारा-गोंदिया: ज्या मतदारसंघातून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आणि ते पराभूत झाले. जिथून डॉ. श्रीकांत जिचकार पराभूत झाले, त्यानंतर केंद्रात मंत्री असलेले प्रफुल पटेल देखील पराभूत झाले. त्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला इथं निवडणूक होतेय आणि सध्या इथे प्रचाराचा धुरळा सुरु आहे. तब्बल 18 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप, काँग्रेस, वंचित, बसपासह अपक्ष आणि बंडखोरांमुळं ही निवडणूक रखरखत्या उन्हासारखीच सध्या खूपच तापली आहे. (lok sabha election 2024 reputation of praful patel and nana patole is at stake whose problems will the rebels increase in bhandara gondia lok sabha constituency)

यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे सर्वात खास वैशिष्ट्य असे की जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसणार आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच लोकसभा निवडणूक लढवत होती. त्यामुळे काँग्रेसला इथं संधी मिळाली नव्हती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटासोबत आहेत. आता भाजपसोबत अजित पवार गट असल्याने भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उतरवलं आहे. हे दोघे जरी प्रमुख उमेदवार मानले जात असले तरी वंचितचे संजय केवट यांच्या भाजपमधून बाहेर पडून बसपाकडून मैदानात उतरलेले संजय कुंभलकर आणि अपक्ष सेवक वाघाये हे देखील या निवडणुकीत प्रभाव टाकत आहेत. 

आता प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात असताना इथली परिस्थिती काय आहे, बंडखोर कुणाचा गेम बिघडवणार, भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर काय आव्हानं आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

भंडारा गोंदिया मतदारसंघात भाजपकडून सुनील मेंढे आणि काँग्रेसकडून प्रशांत पडोळे मैदानात असले तरी इथली खरी लढत आहे ती प्रफुल पटेल आणि नाना पटोले यांच्यात. प्रत्यक्ष मैदानात नसले तरी पटोले आणि पटेल यांच्यातली राजकीय लढाई हीच या मतदारसंघाची आताची खरी ओळख म्हणावी लागेल.

हे वाचलं का?

    follow whatsapp