Lok Sabha election 2024 : "भाजप 370 जागा जिंकणं अवघड, 4 राज्यात बसू शकतो झटका"
Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळ आले आहेत. त्यामुळे कोण जिंकणार आणि सत्ताधारी भाजपला किती जागा मिळणार याबद्दल चर्चा होत आहे... राजकीय विश्लेषक काय म्हणताहेत वाचा...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ अंदाज
भाजपला किती जागा जिंकणार, एनडीएला किती जागा मिळणार?
काँग्रेसला किती जागा मिळणार, इंडिया आघाडी किती जागा जिंकेेल?
Lok Sabha election 2024 : देशात होत असलेल्या लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे देशात सत्तांतर होणार की, भाजप सत्ता राखणार? भाजप प्रणित एनडीए आघाडी खरंच ४०० जागा जिंकू शकते का? या प्रश्नांभोवती चर्चा होताना दिसत आहे. यासंदर्भात राजकीय विश्लेषकांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. ते काय हेच समजून घ्या... (How many seats will bjp get in lok sabha election 2024)
अॅक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता आणि लोकनीति सीएसडीएसचे सह संचालक संजय कुमार यांनी 'इंडिया टुडे'च्या कार्यक्रमात काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत.
भाजप किती जागा जिंकणार?
लोकनीति सीएसडीएसचे सह संचालक संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना सांगितले की, "माझ्या अंदाजानुसार भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत जवळपास ३०० जागा जिंकेल. मला नाही वाटत की, एनडीए ३७० आणि ४०० जिंकेल."
हेही वाचा >> शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!
"भाजप २७२ पेक्षा अधिक जागा जिंकेल, पण त्या खूप कमी फरकाने असेल. २०१९ त्या तुलनेत ही निवडणूक भाजपसाठी कठीण ठरली आहे. काँग्रेस २०१९ च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल. काँग्रेस जास्त जागा जिंकू शकते", असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.










