Maharashtra Lok Sabha : शिंदेंचाच नेता म्हणतोय, ठाकरेंचा 'हा' उमेदवार "डायरेक्ट खासदार होणार"!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर हे विजयी होतील, असा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि अमोल कीर्तिकर.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

अमोल कीर्तिकर हे विजयी होतील, असे गजानन कीर्तिकर म्हणाले

point

शिवसेनेचे रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत

Gajanan Kirtikar North West Mumbai Lok Sabha election : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सगळ्यांना निकालाची वेध लागले असून, राजकीय नेते वेगवेगळे अंदाज व्यक्त करताना दिसत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल मोठा दावा केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य मुंबई) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, असे कीर्तिकर यांनी म्हटले आहे. (Gajanan kirtikar big statement. he claimed that Shiv Sena UBT Candidate Amol Kirtikar will be win from north west lok sabha constituency)

ADVERTISEMENT

मुलगा ठाकरेंच्या शिवसेनेत बाप शिंदेंच्या शिवसेनेत

शिवसेनेत फूट पडल्यानंतर कीर्तिकर यांच्या कुटुंबातही फूट पडली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असलेले गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले.

हेही वाचा >> 'शिंदे साहेब, गजानन कीर्तिकरांची त्वरित हकालपट्टी करा', शिवसेना नेता संतापला 

त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले. अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी खूप आधीच जाहीर केली होती. अमोल कीर्तिकरांना उमेदवारी दिल्यामुळे गजानन कीर्तिकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. तसे त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा >> फडणवीसांचा उपमुख्यमंत्री होण्यास नकार, मग मोदींनी केला फोन! Inside Story 

आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले गजानन कीर्तिकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या अमोल कीर्तिकरांच्या विजयाबद्दल भाकित करत आहेत. ते काय म्हणाले हे आधी वाचा...

गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकरांच्या विजयाबद्दल काय म्हणाले?

"अमोलला मी बोट धरून शिवसेनेत आणले, पण पक्षामध्ये, राजकारणामध्ये त्याला जी संधी मिळायला हवी होती, त्याला मिळाली नाही. पण, सुदैवाने आता त्याला ती संधी मिळाली आहे. अमोल ना नगरसेवक, ना आमदार... तर आता डायरेक्ट खासदार होणार आहे. खासदारकीची निवडणूक लढवतोय म्हणजे निवडून आल्यावर अमोल खासदारच होणार ना", असे ते म्हणाले.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ईव्हीएम स्ट्राँगरुमपर्यंत गेला अन्...; लंकेनी व्हिडीओच दाखवला 

महायुतीत असलेले गजानन कीर्तिकर यांनी महाविकास आघाडीबद्दलही मोठे भाकित केले. "ज्या पद्धतीने राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत, ते पाहता महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार आहे", असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस सुरू झाली आहे. 

ADVERTISEMENT

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ : रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल कीर्तिकर विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात थेट लढत होत आहे. ठाकरेंनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या खूप आधीच ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं अमोल कीर्तिकर यांना प्रचारासाठी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. दुसरीकडे रवींद्र वायकर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही दिवस आधी उमेदवारी दिली गेली. त्यामुळे त्यांना मोजकाच वेळ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मिळाला.

हेही वाचा >> 'वायकरांनी अटक टाळण्यासाठी उमेदवारी घेतली', शिंदेंच्याच नेत्याने टाकला बॉम्ब 

या मतदारसंघात धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना होताना दिसत आहे. महाराष्ट्रात ठाकरेंबद्दल सहानुभूतीची सुप्त लाट असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. ती मुंबईत किती आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ५४.८४ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ५७.११ टक्के झाले आहे. या मतदारसंघाचे वायकरच आमदार आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT