Lok Sabha Result : महाराष्ट्रातून कोण महिला खासदार झाल्या?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election result 2024 these 8 women candidate won election supriya sule praniti shinde shobha bahchhav pratibha dhanorkar smita wagh varsha gaikwad raksha khadse
महाराष्ट्रातील 7 महिला खासदारांचा विजय झाला आहे.
social share
google news

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर मंगळवारी लागला आहे. या निवडणुकीत अनेक महिला खासदारांनी विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्रातील 7 महिला खासदारांचा विजय झाला आहे. या महिला खासदार नेमक्या कोण आहेत? त्यांनी कोणत्या उमेदवाराला पाडलं? आणि किती मताधिक्याने त्या जिंकल्या आहेत? हे जाणून घेऊयात. (lok sabha election result 2024 these 8 women candidate won election supriya sule praniti shinde shobha bahchhav pratibha dhanorkar smita wagh varsha gaikwad raksha khadse)  

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे 

बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पवार विरूद्ध पवार लढत होती. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये ही लढत होत असल्याने, निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांना 7 लाख 32 हजार 312 मतं पडली आहेत, तर सुनेत्रा पवार यांना 5 लाख 73 हजार 979 मते मिळाली होती. त्यामुळे 1 लाख 58 हजार 333 मतांनी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांता पराभव केला आहे. 

शोभा बच्छाव 

धुळे लोकसभा मतदार संघातून दोन वेळ खासदार राहिलेले भाजप उमेदवार सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी पराभव केला. शोभा बच्छाव यांना 5 लाख 83 हजार 866 मतं पडली होती. तर सुभाष भामरे यांना 5 लाख 80 हजार 35 मतं पडली होती. शोभा बच्छाव यांनी 3831 मतांनी भामरे यांचा पराभव केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सत्ता स्थापण करणार की विरोधात? INDIAच्या बैठकीनंतर खरगेंनी काय सांगितलं?

प्रतिभा धानोरकर

चंद्रपुर लोकसभा मतदार संघात भाजपचे सिनिअर लीडर सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 7 लाख 18 हजार 410 मतं पडली होती. त्यामुळे प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी धानोरकर यांनी मुनगंटीवार सारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव केला होता. 

स्मिता वाघ

जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांचा पराभव केला. स्मिता वाघ यांना 6 लाख 74 हजार 428 मतं पडली होती.तर करण पाटील यांना 4 लाख 22 हजार 834 मतं मिळाली होती. त्यामुळे 2 लाख 51 हजार 594 मतांनी करण पाटील यांचा पराभव झाला. 

ADVERTISEMENT

वर्षा गायकवाड 

काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड यांनी सरकारी वकील आणि भाजप उमेदवार उज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांना 4 लाख 45 हजार 545 मतं पडली होती. आणि निकम यांना 4 लाख 29 हजार 31 मतं मिळाली होती. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी 16 हजार 514 मतांनी निकम यांचा पराभव केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Nilesh Lanke : ''माझ्या मुलाला मारण्याचा कट...'', लंकेंच्या आईच्या विधानाने खळबळ

रक्षा खडसे 

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना 6 लाख 30 हजार 879 मतं पडली होती. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3 लाख 58 हजार 696 मतं पडली होती. त्यामुळे रक्षा खडसे यांनी 2 लाख 72 हजार 183 मतांनी विजय मिळवला. इतकचं नाही तर रक्षा खडसे यांनी खासदारकीची हँट्ट्रीक साधली. 

प्रणिती शिंदे 

सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला.प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 मते पडली होती. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 28 मते पडली आहेत. त्यामुळे 74 हजार 197 मतांनी प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांचा पराभव केला. 

दरम्याम 18 व्या लोकसभा निवडणुकीत फक्त 30 किंवा 30 पेक्षा जास्त महिला उमेदवार विजयी घोषित झाल्या आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकीत हीच संख्या 78 होती. गेल्या टर्मपेक्षा यंदा कमी महिला खासदार जिंकून आल्या आहेत.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT