Lok Sabha Elections 2024 : 'खिचडी चोर'; ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस नेत्याचे बंड

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok sabha Election 2024) महाराष्ट्रात सध्या जागा वाटपावरून राजकीय खलबतं सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपले 17 उमेदवार जाहीर केले आहेत, तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 9 जागांवर आपली उमेदवारी निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये आता बंडखोरीचे आवाज उठू लागले आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी तिकीट वाटपावरून शिवसेनेवर (UBT) जोरदार हल्लाबोल करत त्यांच्याच काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आहे. (Lok Sabha Elections 2024 Sanjay nirupam said i will not work for Khichdi chor about amol kirtikar shivsena UBT)

ADVERTISEMENT

संजय निरुपम म्हणाले, 'आज सकाळी शिवसेनेने (UBT) मुंबईतील 4 जागांवर घोषणा केली असून उद्यापर्यंत 5 जागांवर घोषणा केली जाईल. काँग्रेसला 1 जागा खैरातीत दिली. याला माझा विरोध आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चेत मी सहभागी होतो. वायव्य भागातील शिवसेना उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. कोरोनाच्या काळात खिचडी घोटाळा करणाऱ्या अशा खिचडी चोराला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे. मी जाहीर करतो की मी अशा खिचडी चोराला प्रोत्साहन देणार नाही.' असं म्हणत निरूपम यांनी शिवसेनेवर (UBT) जहरी टीका केली.

संजय निरूपम यांनी स्वतःच्या पक्षावर साधला निशाणा

आपल्याच पक्षावर निशाणा साधत निरुपम म्हणाले, 'काँग्रेसने कित्येक दिवस माझ्याशी चर्चाही केलेली नाही. मला विचारलेही नाही. काँग्रेस देशात न्यायाच्या गप्पा मारते पण आपल्याच लोकांकडे लक्ष देत नाही. मी अनेक वर्षांपासून माझ्या क्षेत्रात काम करत आहे. मात्र सर्वोच्च नेतृत्वाने दखल न घेता शिवसेनेपुढे झुकले. मी माझ्या नेतृत्वाला 1 आठवड्याचा वेळ देतो, जर निर्णय झाला नाही तर आठवडाभरात मी माझा स्वतंत्र निर्णय घेईन आणि लढा आता एंड टू एंड असेल. ज्या प्रकारे काँग्रेसच्या जागा हिसकावून घेतल्या गेल्या आणि काँग्रेसचे लोक वेगळे झाले, शिवसेनेचा (UBT) छुपा हेतू काँग्रेसला नष्ट करण्याचा असू शकतो.' 

हे वाचलं का?

अरविंद सावंत यांच्या टीकेवर निरुपम यांचा पलटवार

 
संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडूनही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रतिक्रिया आलेली आहे. पक्षाचे नेते अरविंद सावंत म्हणाले, 'कोण आहेत संजय निरुपम? मला माहीत नाही.. एकदा उद्धव ठाकरेंनी जागा जाहीर केल्यावर विषय संपला.' अरविंद सावंतांच्या या वक्तव्यावर 'त्यांना माहीत नाही.. ते म्हातारे झाले आहेत. अरविंद सावंत यांची स्मरणशक्ती गेली. काँग्रेसचा पाठिंबा होता आणि शिवसेनेने मुंबईत काँग्रेसला गाडण्यात मदत केली. मुंबईत काँग्रेसला वाचवण्यात आमचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. काँग्रेस देशातील न्यायाच्या गप्पा मारते पण आपल्याच लोकांकडे लक्ष देत नाही.' असं म्हणत संजय निरुपम यांनी अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर पलटवार केला. 

शिवसेनेकडून (UBT) उत्तर-पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकरांची उमेदवारी जाहीर

उत्तर-पश्चिम ही मुंबईची जागा आहे, जिथे शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले आहे, तर काँग्रेसने संजय निरुपम यांच्यासाठी या जागेवर दावा केला होता. कोरोना काळात खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना (UBT) नेते अमोल कीर्तिकर यांना समन्स बजावले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी किर्तीकर यांची चौकशीही केली होती. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT