Maharashtra Lok Sabha : मुंबईत संथ गतीने मतदान, निवडणूक आयोगावर दिरंगाईचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai 6 lok sabha constituency slow voting percentage down election commision of india aditya thackeray
मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
social share
google news

Maharashtra Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज मतदान पार पडतय. या 13 मधील सहा मतदार संघ हे मुंबईतले आहे. या सहाही मतदार संघातील मतदान केंद्रांवर दिंरगाई होत असल्याचा आरोप मतदारांकडून होत आहे. अनेक मतदारांनी संथ गतीने मतदान होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे तासंनतास मतदारांना केंद्राबाहेर ताटकळत उभं राहावं लागत आहे. तरी देखील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे.  (mumbai 6 lok sabha constituency slow voting percentage down election commision of india adiya thackeray) 

मुंबईतील सहाही मतदार संघातील अनेक मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप होतोय. मतदान केंद्रावर दोन तीन वेळा नावे तपासली जात आहे. ज्यामुळे मतदानास उशीर होत असून मतदारांच्या रांगा संथगतीने पुढे सरकतायत. अनेक केंद्रावर पंख्याची आणि पाण्याची व्यवस्था नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी आहेत. यामुळे अनेकाना कडाक्याच्या उन्हात चक्कर देखील आल्या आहेत. त्यामुळे काही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : 'त्यांना खोलीतून सोडू नका, पहाटेचे 5 वाजले तरी...', ठाकरे संतापले!

तिकडे पवई हिरानंदानी भागात दोन तासापासून मतदान खोळंबलं आहे. बंद पडलेले मतदान यंत्र बदलून देखील मतदान खोळंबलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून राग व्यक्त केला आहे. मुंबईतील पोलिंग बुथवर सोयीसुविधा कमी असल्याचा आरोप केला आहे. मतदारांना अनेक मतदान केंद्रावर उन्हात उभं राहाव लागलं आहे, पाण्याची आणि पंख्याची सोय नाही. सावलीत उभं राहता येईल अशी देखील व्यवस्था करण्यात आली नाही आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच अनेक केंद्रावर घड्याळ घालायचं की नाही घालायचं, मोबाईल आत न्यायचा की नाही यावरून देखील गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला आहे. अशापरिस्थितीत माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी मुंबईतील मतदारांना सहकार्य करावे. 

मतदानासाठी वेळ वाढवावी 

मुंबईतली मतदारांना मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर वाट बघावी लागते आहे. उन्हाची लाही लाही त्यात केंद्रावर कोणतीही व्यवस्था नसल्याने मतदार त्रासलेले आहेत. त्यामुळे ते मतदान न करता घरी सुद्धा जात आहेत. तसेच मतदानाच्या या प्रक्रियेत त्रुटी आढळतायत. त्यामुळे मतदानाची वेळ तासभर वाढवावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ''बिल्डरपुत्राला जामीनासाठी रेड कार्पेट, पोलिस ठाण्यात बिर्याणी, पिझ्झा पार्टी...'',

मतदानाची आकडेवारी 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात 48.66 टक्के मतदान झाले. पाहा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी...

ADVERTISEMENT

  • भिवंडी - 48.89% मतदान 
  • धुळे - 48.81% मतदान 
  • दिंडोरी - 57.06% मतदान 
  • कल्याण - 41.70% मतदान 
  • उत्तर मुंबई - 46.91% मतदान 
  • उत्तर मध्य मुंबई - 47.32% मतदान 
  • उत्तर पूर्व मुंबई - 48.67% मतदान 
  • उत्तर पश्चिम मुंबई  - 49.79% मतदान 
  • दक्षिण मुंबई - 44.22% मतदान 
  • दक्षिण मध्य मुंबई - 48.26% मतदान 
  • नाशिक - 51.16% मतदान 
  • पालघर - 54.32% मतदान 
  • ठाणे - 45.38% मतदान 
     

निवडणूक आयोगाकडून निवेदन जारी 

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारीनंतर  महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात कोणताही मतदार जो संध्याकाळी 6 वाजता रांगेत असेल त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. संध्याकाळी 6 वाजता रांगेत उभे असलेले सर्व मतदार मतदान करेपर्यंत मतदान केंद्र सुरू राहील, असे आयोगाने सांगितले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT