Amravati Lok Sabha : "मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये", नवनीत राणांचे विधान
Navneet Rana Statement on PM Modi : नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानाची मतदारसंघात आणि राज्यात चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अमरावती लोकसभा निवडणूक २०२४

मोदींची हवा या फुग्यात राहू नका -नवनीत राणा

अमरावती मतदारसंघात प्रचारादरम्यान विधान
Navneet Rana On PM Modi : काही दिवसांपूर्वी भाजप आलेल्या आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांच्या विधानाची मतदारसंघात आणि राज्यात चर्चा रंगली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आणि 2019 मध्ये अमरावतीमध्ये काय राजकीय स्थिती होती, हेच जाणून घ्या. (Navneet Rana stated that do not depend on Modi wave)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि महायुतील मित्रपक्षांचा विरोध झुगारून भाजपने राणा यांनी उमेदवारी दिली. त्यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. पण, त्यांनी केलेल्या एका विधानाने भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
नवनीत राणा नक्की काय बोलल्या?
नवनीत राणा यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या म्हणताहेत की, "ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायती सारखी लढायची आहे. 12 वाजेपर्यंत सर्व मतदार आपल्याला बुथवर न्यायचे आहेत. सर्वांनी मतदान केलं पाहिजे."
हेही वाचा >> महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल
पुढे त्या म्हणतात की, "मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये. एवढी मोठी यंत्रणा असून 2019 मध्ये एक अपक्ष उमेदवार निवडून आली होती आणि आपला झेंडा गाडून गेली होती", असं विधान नवनीत राणा यांनी केले आहे.