Salman Khan च्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचे फोटो आले समोर, ते दोघे कोण?
Who Fired outside of salman khan : सलमान खान यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोन संशयितांचे फोटो समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सलमान खानच्या घरावर कुणी केला गोळीबार?
दोन संशयितांचे फोटो आले समोर
मुंबई पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
Salman Khan House Firing : (दीपेश त्रिपाठी, मुंबई) 14 एप्रिल रोजी सकाळी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराच्या दिशेने तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. कडक सुरक्षा असूनही पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात हल्लेखोर अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. दोन्ही गोळीबार बाईकवर आले आणि नंतर गोळीबार करून तेथून पळून गेले. दोघांनी हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्यांची लगेच ओळख कळू शकली नव्हती.
ADVERTISEMENT
दोन्ही हल्लेखोरांची छायाचित्रे आली समोर
गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांची छायाचित्रे समोर आली आहेत. काळ्या आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये एक हल्लेखोर दिसत आहे. तर दुसरा लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. हे छायाचित्र सीसीटीव्ही फुटेजवरून मिळाले आहे.
या छायाचित्राच्या आधारे या दोघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या दोघांचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत. गोळीबार करणाऱ्यांबाबत केंद्रीय यंत्रणांना महत्त्वाचे सुगावा मिळाले आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शरद पवारांनी मोदींची पुतीन यांच्याशी का केली तुलना?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा संबंध हरियाणा आणि राजस्थानशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित कुख्यात राजस्थानचा गुंड रोहित गोदाराच्या टोळीने शूटरची व्यवस्था केली असण्याची शक्यता आहे.
यासोबतच रोहित गोदाराविरोधात इंटरपोलची नोटीसही जारी करण्यात आली आहे. राजस्थानमधील खळबळजनक गोगामेडी हत्याकांडात रोहित गोदाराचे नाव पुढे आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांपाठोपाठ दिल्ली पोलिसही सक्रिय झाले आहेत. दोन्ही हल्लेखोरांचे फोटो सर्व पोलीस ठाण्यात व्हायरल करण्यात आले आहेत.
ते दोन हल्लेखोर कोण?
सूत्रांच्या माहितीनुसार, सीसीटीव्हीमध्ये मागे उभा असलेला शूटर विशाल उर्फ कालू असू शकतो. कालू हा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी आहे. तो राजस्थानचा कुख्यात गुंड रोहित गोदाराचा शूटर आहे.
कालूने नुकतीच हरियाणातील रोहतकमध्ये एका बुकीची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडात बुकीच्या आईलाही गोळ्या लागल्या होत्या. रोहतक हत्याकांडातही कालू फरार आहे.
हेही वाचा >> धैर्यशील मोहिते पाटलांनी फुंकली 'तुतारी', काय बोलले?
वांद्रे पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सलमान खानच्या सुरक्षा रक्षकाच्या जबाबाच्या आधारे मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्यांनी दुचाकी वांद्रयातच सोडली आणि रिक्षात बसून पळ काढला. हल्लेखोर आत्तापर्यंत मुंबईतून पळून गेले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. हल्लेखोरांनी रिक्षातून दहिसर नाका ओलांडल्याचा संशय आहे. गोळीबार करणारे महाराष्ट्रातील नसले, तरी बाहेरचे असू शकतात.
हेही वाचा >> भाजपला 14 ते 17 जागा; 'मविआ'ला किती? महायुतीला टेन्शन देणारा पोल
सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याआधीही सलमानवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबाराची बाब गंभीर आहे.
सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा 24 तास पहारा
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर सलमान खानला मुंबई पोलिसांनी सर्व शस्त्रे आणि सुरक्षा कर्मचारी दिले आहेत. सलमानला वैयक्तिक शस्त्र परवाना देखील देण्यात आला आहे, जेणेकरून तो त्याच्या संरक्षणासाठी वैयक्तिक शस्त्रे ठेवू शकेल. त्यांच्या घराभोवती तीन शिफ्टमध्ये 24 तास कडेकोट पोलिस बंदोबस्त असतो.
सलीम खान यांनी सोडले मौन
दोन्ही हल्लेखोरांनी पहाटे 4.50 च्या सुमारास सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमही सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेली. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यात फॉरेन्सिक टीम भिंतीवर लागलेल्या गोळ्याच्या खूणा बघताना दिसत होती.
सलमानचे वडील सलीम खान यांनी गोळीबाराच्या मुद्द्यावर मौन सोडले आणि म्हणाले की, "खुलासा करण्यासारखे काही नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी हवी असते. ज्यांना सलमानचे नुकसान करायचे आहे, त्यांना फक्त त्याच्या नावाने प्रसिद्धी मिळवायची आहे."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT