Lok Poll : भाजपला 14 ते 17 जागा; 'मविआ'ला किती? महायुतीला टेन्शन देणारा पोल

मुंबई तक

Maharashtra Opinion Poll Lok Sabha election 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात, पहा ताज्या ओपिनियनचे पोल काय?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, लोकसभा निवडणूक २०२४ ओपिनियन पोल.
महाराष्ट्रातील ४८ जागांचे ओपिनियन पोल काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४

point

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ओपिनियन पोल

point

लोक पोलच्या ओपिनियन पोलमध्ये काय?

Opinion Poll Maharashtra : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी काही ओपिनियन पोल समोर आले आहेत. यातील एका पोलने महायुतीच्या चिंतेत भर घातली आहे. लोक पोलच्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. तर समजून घेऊयात पोलचे कौल काय आहेत? (Maharashtra latest lok sabha Opinion poll  2024 : Big Set back to Mahayuti and Maha Vikas Aghadi may rise in lok sabha elections)

लोक पोल या निवडणुकांचे अंदाज व्यक्त करणाऱ्या आणि ओपिनियन पोल घेणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचा पोल प्रसिद्ध केला आहे. या पोलनुसार महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. 

प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 1350 सर्वेक्षणाच्या आधारावर ओपिनियन पोलचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. पश्चिमकडे सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीला 25 च्या आत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी महायुतीला 21-24 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात 14-17 जागा भाजपला मिळू शकतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp