Punjab Crime : केकमुळे गेला बर्थडे गर्लचा जीव, तपासात समोर आली धक्कादायक बाब

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

punjab crime news 10 years old girl died on her birthday after eating birthday cake shocking crime story
मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आईने झोमॅटोवरून केक मागवला होता.
social share
google news

Punjab Crime News : वाढदिवस म्हटलं तर केक आलाच, या केकशिवाय वाढदिवस पुर्ण होत नसतो. मात्र आता एका केकनेच 10 वर्षीय मुलीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. पंजाबच्या पटीयालामध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या बेकरीतून कुटुंबियांनी केक मागवला होता, तपासात हे दुकानचं अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय उपस्थित होतोय.  (punjab crime news 10 years old girl died on her birthday after eating birthday cake shocking crime story) 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मुळची पंजाबची रहिवासी असलेल्या 10 वर्षीय मुलीचा वाढदिवस हा 24 मार्च रोजी होता. आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आईने झोमॅटोवरून केक मागवला होता. त्यानंतर कुटुंबियांनी मिळून केक कापून मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. केक खाल्यानंतर अचानक मुलीची तब्येत खराब झाली. त्यामुळे कुटुंबियांनी तिला रूग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. 

हे ही वाचा : Ajit Pawar : 'ही जागा राष्ट्रवादीची होती, पण...',

या मृत्यूनंतर संतापलेल्या कुटुंबियांनी ज्या दुकानातून केक मागवला होता. त्या दुकानाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दुकानाची चौकशी केली असता तपासात अशाप्रकारच दुकानच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कुटुंबियांना मोठा हादराच बसला होता. त्यामुळे आता नेमका कोणी केक घरी पाठवला होता? असा प्रश्न उपस्थित होत होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अखेर या प्रकरणात मुलीच्या कुटुंबियांनीच केकच्या दुकानाचा मुळ मालक शोधण्यासाठी स्वत:हून प्रयत्न सुरू केला. यासाठी कुटुंबियांनी पुन्हा एकदा 30 मार्चला झोमॅटोवरून केक मागवला. हा केक जसा घरी डिलिव्हर झाला तसा कुटुंबियांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या हवाली केले. 

हे ही वाचा : शिवसेनेने नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..

पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतल्यानंतर ज्या दुकानातून त्याने केकची ऑर्डर घेतली होती. त्या दुकानात त्याला नेण्यास सांगितले होते. पोलीस ज्यावेळेस दुकानात पोहोचली, त्यावेळेस तिकडे भलतंच दुकान सुरु होते. आणि ज्या दुकानावरून ऑनलाईन केक मागवला गेला होता ते दुकान अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे पोलीस देखील बुचकळ्यात पडली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालकाची चौकशी केली असता खरं सत्य समोर आलं. बेकरी मालकाने 'कान्हा फर्म'च्या नावाने बेकरी रजिस्टर केली होती. आणि ऑनलाईन डिलिव्हरीसाठी त्यांनी 'न्यू इंडिया'च्या नावाचा वापर केला होता. त्यामुळे आता पोलिसांनी बेकरी मालकाच्या विरूद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सध्या बेकरीतल्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तर बेकरी मालक फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT