Exit Poll : उत्तर प्रदेशात भाजपला किती मिळणार जागा? सी व्होटरचा धक्कादायक एक्झिट पोल
Republic Matrize Exit Poll : रिपब्लिक भारत मॅट्रिज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच लोकसभा निवडणुकीत सुपडासाफ होताना दिसतोय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मायावती यांची बसपा पार्टी एकही जागा जिंकताना दिसत नाही आहे.
ADVERTISEMENT
Republic Matrize Exit Poll : देशातील लोकसभा निवडणूक आता संपूष्ठात आली आहे. आज सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांकडे संपू्र्ण देशाचे विशेष लक्ष असते. कारण या राज्यातील निकाल नेमका केंद्रात कोण सत्तेत येतो हे ठरवत असतो.त्यामुळे आता एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपला किती जागा मिळतायत? हे जाणून घेऊयात. (repubic matrize exit poll result for uttar pradesh lok sabha elction 2024 congress samajwadi party akhilesh yadav rahul gandhi yogi adityanath how many seat bjp get in uttar pradesh lok sabha 2024)
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला 6 ते 11 जागा मिळताना दिसतात. पोलच्या अंदाजानुसार समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या युतीला कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 11 जागा मिळताना दिसत आहेत.
हे ही वाचा : India Today- Axis My India Exit Poll: ठाकरे-शिंदेंची उडणार झोप! खळबळ उडवणारा पोल
भाजपचा मोठा विजय
भारत मॅट्रीजच्या एक्झिट पोलनुसार, उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या 80 जागांवर भाजपला 69 ते 74 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार आहे.
हे वाचलं का?
बहुजन समाज पार्टीचा सुपडासाफ
रिपब्लिक भारत मॅट्रिज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टीच लोकसभा निवडणुकीत सुपडासाफ होताना दिसतोय. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मायावती यांची बसपा पार्टी एकही जागा जिंकताना दिसत नाही आहे. त्यामुळे या पोलमध्ये बसपाने त्यांचे खाते देखील उघडले नाही आहे.
हे ही वाचा : ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!
दरम्यान हे फक्त एक्झिट पोलचे अंदाज आहेत. आता 4 जूननंतर येणाऱ्या निकालानंतर हे आकडे किती खरे ठरतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT