Prakash Ambedkar : सांगलीत आंबेडकर-पाटील ठाकरेंच्या उमेदवाराचा करणार गेम?
Sangli lok Sabha election vishal patil : प्रकाश आंबेडकर यांची विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी भेट घेतली. त्यांनी चर्चा केली असून, वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
विशाल पाटील हे अपक्ष लढवण्याच्या तयारीत
प्रकाश आंबेडकरांची विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी घेतली भेट
Sangli Lok Sabha election 2024, Prakash Ambedkar Vishal Patil : सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेनेकडे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गेला आहे. या जागेसाठी काँग्रेसचे विशाल पाटील आग्रही होते, पण ठाकरेंनी आधीच चंद्रहार पाटील यांचे नाव घोषित केले. पण, आता चंद्रहार पाटील यांच्यासमोर विशाल पाटलांचंच आव्हान असणार, असं दिसतंय. याला प्रकाश आंबेडकरांनीही दुजोरा दिला. विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीनंतर आंबेडकरांनी महत्त्वाची माहिती दिली. (Vishal Patil's Brother pratik Patil meets Prakash Ambedkar)
ADVERTISEMENT
सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याने सांगली काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार, हे निश्चित मानलं जात आहे. त्यातचं त्यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
प्रकाश आंबेडकरांचे उद्धव ठाकरे, शरद पवारांकडे बोट
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागा मिळाल्या नाही. याबद्दल प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे बोट केले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> राज ठाकरेंना पहिला धक्का! मोदींना पाठिंबा देताच 'या' नेत्याने सोडली साथ!
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "काँग्रेसने आधी ठरवलं पाहिजे की, महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही? सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली."
वंचित बहुजन आघाडी विशाल पाटलांना पाठिंबा देणार का?
"आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले. चर्चाही त्यांनी केली. ते लवकरच काहीतरी निर्णय घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो", अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देणार आहात का? असा प्रश्न जेव्हा आंबेडकर यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, "चर्चा झाली हे मी सांगितलं. निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही घेऊ."
हेही वाचा >> शरद पवारांनी सातारा, रावेरच्या उमेदवारांची केली घोषणा
वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आता तेच लढणार आहेत, तर ऑफर काय देणार? मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कोणतंही सल्ला दिलेला नाही. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की अर्ज भरल्यानंतर आपण ठरवू."
विशाल पाटील अपक्ष लढणार?
काँग्रेसला सांगलीची जागा मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर सांगली काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. विशाल पाटील यांच्याकडून आता अपक्ष लढण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
विशाल पाटील हे अपक्ष लढल्यास आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिल्यास महाविकास आघाडीला जास्त फटका बसू शकतो. यात ठाकरेंच्या उमेदवाराचा कार्यक्रम होईल, असेही स्थानिक राजकारणात बोलले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT