Maharashtra : ठाकरेंना झटका, 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात?; शिवसेना नेत्याच्या दावाने खळबळ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray big blow 2 mp are touch with eknath shinde shiv sena naresh mhaske statement maharashtra lok sabha
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या आहेत.
social share
google news

Uddhav Thackeray Shiv Sena Big Blow : लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेने 9 जागा जिंकल्या आहेत. तर खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे सेनेने 7 जागा जिंकल्या आहेत. या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपलं नेतृत्व दाखवून दिले आहे आणि त्यांच्या जवळ असलेली शिवसेना असली असल्याचे सिद्ध देखील केले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना मोठ धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंच्या (Eknath Shinde) संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेत्याने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात माजली आहे. (uddhav thackeray big blow 2 mp are touch with eknath shinde shiv sena naresh mhaske statement maharashtra lok sabha) 

ठाकरे गटाचे 2 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच हे 2 खासदार आणखीन  6 खासदारांचा पाठिंबा मिळवणार आहे. आमदार अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी हा प्लॅन असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे 

हे ही वाचा : शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे परतणार? संजय राऊतांचं मोठं विधान

नरेश म्हस्के म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आपल्या मतदार संघात विकासकामे झाली पाहिजेत. म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. तसेच आमदार अपात्रतेचा एक मुद्दा आहे, यासाठी या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे, असा दावा म्हस्के यांनी केलेला आहे. तसेच आम्ही आता दोन आहोत आणखीन 6 लोकांची संख्या जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो. अशा प्रकारचा त्यांचा प्लॅन आहे. ही घडामोड काल रात्री दिल्लीत घडल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुल्ला, मौलविंना लाखो रूपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान बदलणार अशा पद्धतीने गैरसमज निर्माण करून विशिष्ट समाजाची मतं आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न झाला. यामुळे 3 ते 4 जागांवर उबाठा गटाला झाल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर मोठी कारवाई

    follow whatsapp

    ADVERTISEMENT