PM Modi new cabinet : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाकारलं मंत्रिपद, काय बिनसलं? Inside Story

मुंबई तक

PM Modi cabinet ministers : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार, याची उत्सुकता होती. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणीही मंत्री नसणार आहे.

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही मंत्री नसणार.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवे कॅबिनेट मंत्रीपद.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही

point

राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार प्रस्ताव नाकारला

point

कॅबिनेट मंत्री पदावरच भर, मंत्रिमंडळ विस्तारात विचार होणार

Modi New Cabinet 2024 : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री नसणार. दिल्लीतील खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपकडून देण्यात आलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने नाकारला आहे. नेमकं काय घडलं, याबद्दल फडणवीसांनीच खुलासा केला. (Ajit Pawar's Ncp Wants Cabinet instead of MoS independent)

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण मंत्री असणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. लोकसभेची एकच जागा असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार की नाही, याबद्दलही चर्चा होती. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्रिपद नाकारलं... 

रविवारी (9जून) सकाळपासूनच दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यांच्या नावाची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असणार आहे. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कुणीही मंत्री नसेल.

हेही वाचा >> "... म्हणून 'मविआ'सोबत आघाडी केली नाही", आंबेडकरांचे गंभीर आरोप 

शपथविधी सोहळ्याआधी दिल्लीतील सुनील तटकरे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची बैठक झाली. बराच वेळ नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतरही सस्पेन्स कायम होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच याबद्दलचा खुलासा केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp