Prakash Ambedkar : "... म्हणून 'मविआ'सोबत आघाडी केली नाही", आंबेडकरांचे गंभीर आरोप

मुंबई तक

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha elections 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशबद्दल बोलतानाच महाविकास आघाडीसोबत आघाडी न करण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

ADVERTISEMENT

Prakash Ambedkar on Lok Sabha Election And alliance with Maha vikas aghadi
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांबद्दल भूमिका मांडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रकाश आंबेडकरांचे लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य

point

महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

point

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत निवडणूक का लढवली नाही?

Prakash Ambedkar on Lok Sabh elections 2024 : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. महाविकास आघाडीसोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल आंबेडकरांनी आता खुलासा केला आहे. महाविकास आघाडीवर आंबेडकरांनी गंभीर आरोप केले आहेत. (Prakash Ambedkar has made serious allegations against Mahavikas Aghadi)

प्रकाश आंबेडकर यांनी एक दीर्घ पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे निराश झालो असल्याचंही म्हटलं आहे. त्याचबरोबर विधानसभेची तयारी करणार असल्याचेही स्पष्ट केले. 

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटलंय? वाचा जसंच्या तसं

"आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही." 

"वंचित बहुजन आघाडीचा मूळ पायाच फुले-शाहू-आंबेडकर असून, "जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम" यांच्याकडूनच आम्हाला ताकद मिळते. आमची बांधिलकी निरपेक्ष आहे. सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांची बाजू मांडणे आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्व आणि हक्कांसाठी लढणे हेच आमचे ध्येय आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp