Opinion Poll Maharashtra : शिंदे-पवार सोबत तरीही भाजपचं मिशन 45 धोक्यात! मविआचं काय?
Maharashtra Latest Opinion poll : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा ओपिनियन पोलसमोर आला आहे...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लोकसभा निवडणूक २०२४ ओपिनियन पोल

महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळू शकतात?

टाइम्स नाऊ ईटीजी सर्वेक्षणाचे आकडे काय आहेत?
Times now-etg survey 2024 Lok Sabha Maharashtra : महाराष्ट्रातील 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या, असा निर्धार भाजप प्रणित महायुतीने केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडत भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतले. पण, त्यांचा फायदा होताना दिसत नाहीये. दुसरीकडे महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कशी राहू शकते, याबद्दलचा नवा ओपिनियन पोल समोर आला आहे. त्यामुळे महायुतीच नाही, तर महाविकास आघाडीचे टेन्शन times now-etg survey 2024 च्या ओपिनियन पोलने वाढवलं आहे. (times now-etg survey 2024 opinion poll about Maharashtra's 48 lok Sabha seats)
एनडीए लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जागा जिंकेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट महायुतीने ठेवले आहे. पण, ते साध्य होण्याची शक्यता कमी दिसत आहे. इंडिया टुडे-सी व्होटर, इंडिया टीव्ही सीएनएक्स या दोन ओपिनियन पोलनंतर आता टाईम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेमधूनही असाच कौल आला आहे.
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती... महाराष्ट्रात कुणाला किती जागा?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाची नजर महाराष्ट्राकडे आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. त्याचबरोबर कोणत्याही महत्त्वाच्या निवडणूका न झाल्याने मतांचे समीकरणांचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. अशात समोर आलेले ओपिनियन पोल महायुतीचे टेन्शन वाढवताना दिसत आहे.
टाईम्स नाऊ ईटीजीच्या ओपिनियन पोलनुसार, जर देशात आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुतीला मिळतील असा अंदाज मांडला आहे.