आला रे आला रिंकू राजगुरूच्या नवीन मराठी सिनेमाचा टीझर आला

रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे.
आला रे आला रिंकू राजगुरूच्या नवीन मराठी सिनेमाचा टीझर आला

रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही नवी जोडी असलेला "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. अत्यंत फ्रेश आणि रोमॅन्टिक कथा असलेल्या असलेल्या या चित्रपटाच्या लक्षवेधी टीजरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. येत्या १७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव , राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. समीर कर्णिक यांनी क्युं हो गया ना.. या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी यांनी केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

"आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. चित्रपटाच्या नावातच प्रेमाचे आठ रंग असल्याचं सांगण्यात आलं आहे. टीजरमधून पहिले सात रंग कोणते ते स्पष्ट केलं आहे, आठवा रंग कोणता? याचं उत्तर चित्रपटात मिळेल. रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस लूक, विशाल आनंदची चित्रपटसृष्टीतली दमदार एंट्री या टीजरमधून दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in