अभिनेत्री केतकी चितळेचं काही खरं नाही, अडचणीत आणखी वाढ
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विकृत पोस्ट शेअर करुन वाद ओढावून घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता बरीच वाढ होताना दिसत आहे. आधीच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. काल दिवसभरात केतकीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकी ही अधिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विकृत पोस्ट शेअर करुन वाद ओढावून घेतलेल्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आता बरीच वाढ होताना दिसत आहे. आधीच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात आता राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.
काल दिवसभरात केतकीविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे केतकी ही अधिक अडचणीत आली आहे. दोन गुन्हे पिंपरी-चिंचवडमध्येच दाखल झाले आहेत. तर एक गुन्हा उस्मानाबादमध्ये दाखल झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये केतकीवर दोन गुन्हे दाखल
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान यांनी दिलेल्या तक्रारीवरून केतकी चितळे हिच्यावर देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संत तुकाराम महाराज संस्थान कडून देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड मध्येच एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत.