मारहाणीच्या व्हायरल व्हीडिओवर अजय देवगणने सोडलं मौन..

मारहाणीच्या व्हायरल व्हीडिओवर अजय देवगणने सोडलं मौन..

व्हायरल झालेल्या व्हिडीयोवर अखेर अभिनेता अजय देवगणने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. दिल्लीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान या व्हिडीयोमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. यानंतर अजय देवगणचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र यावर अखेर अभिनेता अजय देवगणने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

अजयने यासंदर्भात ट्विट केलं आहे. अजय त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “माझ्या सारखी दिसणारी व्यक्ती अडचणीत सापडल्याचं दिसतंय. दरम्यान मला याबाबत सतत कॉल येत आहेत. पण माहितीसाठी सांगतो मी कुठेही प्रवास केलेला नाही. त्याचप्रमाणे माझ्यासंदर्भात दिले जाणारे अहवाल सर्व निराधार आहेत. आणि सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.”

दरम्यान यापूर्वी या व्हिडीयोबाबत अजयच्या प्रवक्त्यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. अजयच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “‘तान्हाजी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण दिल्लीत गेला होता. त्यानंतर तो दिल्लीमध्ये गेला नाही. त्यामुळे मिडीयाद्वारे देण्यात आलेल्या भांडणाच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत.”

“गेल्या 14 महिन्यांपासून अजय देवगणने दिल्लीत पाय ठेवलेला नाही. तो गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये ‘मैदान’, ‘मायडे’ तसंच ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाचं शूटींग करतोय. सर्व माध्यमांना विनंती आहे की, काहीही दाखवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या.”, असंही अजयच्या प्रवक्त्याचं म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in