Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर

मीराच्या वागणुकीवर सोशल मीडियावर नेटकरीही नाराज
Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर

मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा खेळ आता चांगलाच रंगात आलेला आहे. टास्कदरम्यान बिग बॉसचं घर हे दोन गटात विभागलं जात असून काही स्पर्धकांच्या वागण्यावर आता सोशल मीडियावरुनही नाराजी व्यक्त केली जात आहे. मीरा जगन्नाथ ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नेटीझन्ससोबत महेश मांजरेकरांच्या रडारवर असल्याचं दिसतंय.

पहिल्या आठवड्यापासून मीराचे घरातील सदस्यांसोबत वाद होत आहेत. पहिल्या आठवड्यात मीराचे जेवणावरुन स्नेहासोबत, नंतर जयसोबत वाद झाले. बिग बॉसच्या घरात हल्लाबोल टास्कदरम्यानही मीराने आक्रमकपणा दाखवत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. परंतू महेश मांजरेकर यांच्या बिग बॉसच्या चावडीवर मीरा पुन्हा एकदा तावडीत सापडली.

या घरात बिग बॉसपेक्षा जास्त कोणाला अधिकार असतील तर ते मीराला. प्रत्येक बाबतीत काहीही झालं की मीराचं हे मला पटत नाही असतंच. तुला पटो वा न पटो आम्हाला काही फरक पडत नाही. हे बिग बॉस सिझन आहे मीरा जगन्नाथ हाऊस नाहीये, अशा शब्दांत मांजरेकरांनी मीराची शाळा घेतली.

Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर
Bigg Boss Marathi : उत्कर्षवर भडकले महेश मांजरेकर, म्हणाले तू सर्वात....पाहा व्हिडीओ

याआधीही पहिल्या आठवड्यात महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथला तिच्या वागण्यावरुन सुनावत, तू आधी ऐकायला शिक असं सुनावलं होतं. त्यामुळे बिग बॉसच्या चावडीवर नेमका काय ड्रामा रंगणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Video : तुला पटो अथवा न पटो...हे Bigg Boss आहे तुझं घर नाही ! मीरा पुन्हा महेश मांजरेकरांच्या रडारवर
Video : तू आधी ऐकायला शिक...Bigg Boss Marathi च्या चावडीवर मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा

Related Stories

No stories found.