आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी केली मोठी कमाई; इतक्या कोटींचा केला गल्ला
आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आलियाने ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करताना अनेकदा सांगितले आहे की हा चित्रपट तिच्यासाठी किती खास आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच तिचा रिअल लाइफ पार्टनर रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. पण हा वैयक्तिक क्षण बाजूला ठेवला तर ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर देखील […]
ADVERTISEMENT

आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आलियाने ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करताना अनेकदा सांगितले आहे की हा चित्रपट तिच्यासाठी किती खास आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच तिचा रिअल लाइफ पार्टनर रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. पण हा वैयक्तिक क्षण बाजूला ठेवला तर ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.
400 कोटींच्या बजेटमध्ये ब्रह्मास्त्रची निर्मिती
रिपोर्ट्सनुसार, जवळपास 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा आलियाच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट तर आहेच, पण बॉक्स ऑफिसवरही हा तिच्यासाठी ऐतिहासिक चित्रपट ठरणार का असं बोललं जातंय. पहिल्याच दिवशी लोकांची गर्दी करून चित्रपटगृहांपर्यंत पोहोचणे हे कलाकारांच्या स्टार पॉवरवर अवलंबून असते. ‘ब्रह्मास्त्र’ प्रेक्षकांसाठी या चित्रपटात आलिया-रणबीरची जोडी पडद्यावर पाहणे देखील उत्कंठा वाढवणारे आहे.
पहिल्याच दिवशी 36 कोटींहून अधिक कमाई