जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात कोर्टानं बजावलं समन्स

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसला 26 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींहून अधिक रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे. अलीकडेच, ईडीनं याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ईडीने जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसला 26 सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींहून अधिक रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे. अलीकडेच, ईडीनं याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ईडीने जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून ठेवले आहे.

जॅकलिन फर्नांडिसला कोर्टानं समन्स पाठवलं

जॅकलिन फर्नांडिसला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला हजर राहण्यासाठी 26 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी, ईडीनं आपल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी बनवले होते. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखर ठग असल्याचे आधीच माहित होते असे ईडीला तपासात समजले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला सुकेश हा खंडणीखोर असल्याचे आधीच माहीत होते, असाही ईडीचा विश्वास आहे. सध्या या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला अटक करण्यात आलेली नसून न्यायालयाने आता या प्रकरणी दखल घेतली आहे.

जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरमुळे ईडीच्या जाळ्यात कशी अडकली?

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटींहून अधिक रकमेच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता सुकेशने अभिनेत्री जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्याचे आढळून आले. त्यानंतर ईडीने कारवाई करत त्याची 7 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर ईडीने आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रानुसार, डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिने सुकेशच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. सुकेश चंद्रशेखरची सहाय्यक पिंकी इराणी हिने त्याला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे. सुकेश त्याची सहकारी पिंकी मार्फत जॅकलिनला महागड्या भेटवस्तू पाठवत असे.

या प्रकरणावर जॅकलिन फर्नांडिसनं लिहिली होती पोस्ट

जॅकलिन या पोस्टमध्ये म्हणते, प्रिय मी(स्वतःला उद्देशून) जगातल्या सगळया चांगल्या गोष्टींसाठी मी पात्र आहे. मी खंबीर आहे. स्वतःला मी स्वीकारलं आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल हा विश्वास आहे. मी माझी स्वप्नं पूर्ण करेन, मी सगळं काही करू शकते. या आशयाची पोस्ट जॅकलिनने स्वतःला उद्देशून लिहिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp