215 कोटी वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; पोस्ट शेअर करत म्हणाली..

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे.
215 कोटी वसुली प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; पोस्ट शेअर करत म्हणाली..

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. 215 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने अभिनेत्रीचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने जॅकलिन फर्नांडिसविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. जॅकलिन फर्नांडिसलाही वसुलीच्या रकमेचा फायदा झाल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुकेश हा गुन्हेगार असल्याचे तिला माहीत होते. यासंदर्भात जॅकलिन फर्नांडिसने एक पोस्ट शेअर केली आहे.

जॅकलिन फर्नांडिसने शेअर केली पोस्ट

जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "प्रिय, मी जगातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे. मी ताकदवर आहे. मी स्वत: ला स्विकारलं आहे. लवकरच सर्व काही ठीक होईल. मी मजबूत आहे. मी माझी सर्व स्वप्ने पूर्ण करीन. मी सर्व काही करू शकते." या पोस्टमध्ये जॅकलिन फर्नांडिसने ही पोस्ट का शेअर केली हे सांगितलेले नाही. जॅकलिन फर्नांडिसने ईडी आणि सुकेशच्या प्रकरणावर बराच काळ मौन बाळगले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने जॅकलीनला पूर्णपणे वेठीस धरले आहे. त्याच वेळी, आता ईडीने अभिनेत्रीवर 215 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला आहे. ईडीने आज अभिनेत्रीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. सुकेश हा गुन्हेगार असून तो तिहार तुरुंगात आहे हे जॅकलिनला माहीत होते, पण तरीही तिने त्याच्याकडून भेटवस्तू घेतल्या.

जॅकलिन फर्नांडिसचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये

ईडीच्या कारवाईनंतर एकीकडे जॅकलिन फर्नांडिस वाईटरित्या अडकताना दिसत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्रीचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. यामध्ये अभिनेत्रीचे दोन चित्रपट बिग बजेटचे आहेत. जॅकलिन बॉलिवूडचा अॅक्शन किंग अक्षय कुमारसोबत 'राम सेतू'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात नुसरत भरुचाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. जॅकलिनच्या चित्रपटाचे बजेट 80 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय जॅकलीन रोहित शेट्टीच्या 'सर्कस' चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत रणवीर सिंग आणि पूजा हेगडे स्क्रिन शेअर करणार आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in