“प्रियांका चोप्राचा ‘मिस वर्ल्ड’ किताब फिक्सिंग होता”, माजी मिस बार्बाडोस लिलानीच्या आरोपानं खळबळ
आज प्रियांका चोप्रा फक्त बॉलीवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल स्टार बनली आहे. भारतापासून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणा-या प्रियांकाला मिस वर्ल्ड 2000 स्पर्धा जिंकताना प्रथमच संपूर्ण जगाने पाहिले होते. प्रियांकाने जगातील सर्वात जुनी सौंदर्य स्पर्धा जिंकून आपला ठसा उमटवला होता आणि येथूनच तिच्यासाठी चित्रपटांचे दरवाजे उघडले होते. पण आता प्रियांकाच्या विजयावर मोठा प्रश्न उपस्थित होत […]
ADVERTISEMENT

आज प्रियांका चोप्रा फक्त बॉलीवूड अभिनेत्री नाही तर ग्लोबल स्टार बनली आहे. भारतापासून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणा-या प्रियांकाला मिस वर्ल्ड 2000 स्पर्धा जिंकताना प्रथमच संपूर्ण जगाने पाहिले होते. प्रियांकाने जगातील सर्वात जुनी सौंदर्य स्पर्धा जिंकून आपला ठसा उमटवला होता आणि येथूनच तिच्यासाठी चित्रपटांचे दरवाजे उघडले होते. पण आता प्रियांकाच्या विजयावर मोठा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्याचे कारण म्हणजे माजी मिस बार्बाडोस लीलानी मॅककॉनीचे आरोप. प्रियंकासोबत मिस वर्ल्ड 2000 च्या शर्यतीत सहभागी झालेली लीलानी आता यूट्यूबर आहे. तिच्या एका व्हिडिओमध्ये तिने 2000 सालच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रियांकाचा विजय ‘फिक्स’ असल्याचे वर्णन केले आहे आणि गंभीर आरोप केले आहेत.
22 वर्षांनंतर लीलानी यांनी आरोप का केले?
मिस यूएसए ही सौंदर्य स्पर्धा आजकाल एका स्पर्धकाच्या विजयामुळे खूप वादात सापडली आहे. मिस टेक्सास असलेल्या आर’बॉनी गॅब्रिएलने मिस यूएसए 2022 चे विजेतेपद पटकावल्यानंतर, तिच्या अनेक सहकारी स्पर्धकांनी तिचे अभिनंदन करण्याऐवजी स्टेज सोडला. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन या प्रकरणाची चौकशी करत असून मिस यूएसए अध्यक्ष क्रिस्टल स्टीवर्ट यांना निलंबित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर वाद पेटला आहे आणि लोकांनी सौंदर्य स्पर्धा अर्थात ‘फिक्स’ असल्याची चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, मिस वर्ल्ड 2000 मध्ये सहभागी झालेल्या मिस इंडिया प्रियांका चोप्राला पसंती दिली गेल्या असल्याचा आरोप माजी मिस बार्बाडोस लीलानी हिने केला आहे आणि तिचा विजय आधीच निश्चित होता, असं देखील तिने म्हटलं आहे.
लीलानीने प्रियांकाच्या विजयावर आरोप करत म्हटले की, ‘मी तुम्हाला आठवण करून देते की, गेल्या वर्षीही मिस इंडियाच जिंकली होती. प्रायोजक देखील झी टीव्ही हे भारतीय केबल स्टेशन होते. त्यांनी संपूर्ण मिस वर्ल्ड स्पॉन्सर केले होते. लीलानीने पक्षपाताबद्दल सांगितले की, तिने स्विमसूट राऊंडमध्ये ड्रेस घातला होता. ती म्हणाला, ‘प्रियांका चोप्रा ही एकमेव स्पर्धक होती जिला सारँग घालण्याची परवानगी होती. असे सांगण्यात आले की ती तिची स्किन टोन दुरुस्त करण्यासाठी काही स्किन टोन क्रीम लावत होती, जी बरोबर नव्हती.